शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

अर्ध्या मिनिटात ३९ विषयांना मंजुरी

By admin | Updated: April 25, 2017 23:26 IST

तासगाव पालिकेत सभा गुंडाळण्याचे रेकॉर्ड : राष्ट्रवादीचा विरोध ‘नॉट नोटिसेबल’

तासगाव : तासगाव नगरपालिकेची मंगळवारी झालेली सर्वसाधारण सभा अवघ्या अर्ध्या मिनिटातच गुंडाळण्यात आली. विषयपत्रिकेवरील सर्व ३९ विषयांना बहुमताने मंजुरी देऊन अर्ध्या मिनिटातच सभा संपवण्याचे नवे रेकॉर्ड पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केले. तर सभा गुंडाळण्याला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनादेखील सत्ताधाऱ्यांनी नॉट नोटिसेबल ठरवले.नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेची सभा झाली. यावेळी मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला अहवाल वाचन करण्यापूर्वीच नगरसेवक जाफर मुजावर यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्याची मागणी केली. त्याला सत्ताधारी नगरसेवकांनी तात्काळ पाठिंबा दिला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध करण्यापूर्वीच नगराध्यक्षांसह भाजपचे सर्व नगरसेवक अर्ध्या मिनिटात सभा गुंडाळून सभागृहाबाहेर पडले, तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा विरोध नोंदवून बहुमताने सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.राष्ट्रवादीचे नगरसेवक चुकीच्या कामांना विरोध करतात. म्हणूनच सभा गुंडाळून तासगावच्या जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप यावेळी नगरसेवक अभिजित माळी यांनी केला. चर्चाच करायची नसेल तर सभा घेताच कशाला? असा सवाल नगरसेविका निर्मला पाटील यांनी उपस्थित केला.विषय पत्रिकेवरील ३९ विषय बहुमताने मंजूर झाले. त्यामध्ये स्ट्रीट लाईट दुरुस्ती, कचरा निर्मूलनासाठी आवश्यक रकमेची तरतूद, वॉटर मीटर रिडिंग घेणे, वसुली करणे, बिले देणे याकामासाठी ठेका देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विविध विकासकामांसाठी निधी खर्च करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.सिध्देश्वर कॉलनीत रस्ता करण्याच्या कामासाठी प्राप्त निविदांपैकी महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन्सच्या अंदाजपत्रकीय दराच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. सिध्देश्वर कॉलनीतील अंतर्गत गटरकामासाठी दाखल पाच निविदांपैकी सर्वात कमी अंदाजपत्रकीय दराने दाखल झालेल्या तुषार कदम यांची निविदा मंजूर करण्यात आली.सांगली नाका ते स्मशानभूमीकडे जाणाऱ्या कॉजवेच्या कामामधील संरक्षण भिंत बांधण्याच्या कामासाठीची अर्धा टक्के कमी दराची तुषार कदम यांची निविदा मंजूर करण्यात आली, तर प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी दाखल तीन निविदांपैकी सर्वात कमी रकमेची ७.७७ टक्के इतक्या जादा दराची डेक्कन इन्फ्रा, सांगली यांची निविदा मंजूर करण्यात आली, तर दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत कांबळेवाडीजवळील रिंगरोडवरील नवीन पुलापासून ते साठेनगर स्मशानभूमीपर्यंत एलईडी लॅम्प बसविण्यासाठी दाखल तीन निविदांपैकी पमा इंजिनिअर्स अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल्सची सर्वात कमी अर्धा टक्के कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली. (वार्ताहर)ं ‘लोकमत’चा अचूक अंदाज ‘लोकमत’मधून मंगळवारी होणारी पालिकेची सभा कोणत्याही चर्चेशिवाय गुंडाळण्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी झालेली पालिकेची सभा कोणत्याही चर्चेशिवाय अवघ्या काही सेकंदात गुंडाळून सभा गुंडाळण्याचे नवे रेकॉर्ड केले. सभा गुंडाळण्याचा ‘लोकमत’चा अंदाज अचूक ठरला.