लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : ढगेवाडी (ता. वाळवा) येथील सुभाष ढगे-पाटील यांची केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनामार्फत सांगली जिल्हा तक्रार निवारण प्राधिकारी म्हणून नियुक्त केली आहे. ते निवृत्त मुख्याध्यापक आणि रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य आहेत. नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने त्यांची शिफारस केली.
सुभाष ढगे-पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, रयत शिक्षण संस्थेचा कर्मवीर पुुरस्कार मिळाला आहे. शैक्षणिक, सामाजिक व साहित्य क्षेत्रातील ३२ पुुरस्कार मिळविलेले ते राज्यातील एकमेव शिक्षक आहेत. केंद्र शासन स्तरावरील तीन व राज्य शासन स्तरावरील ११ पुरस्कार मिळाले आहेत. सामाजिक संस्थांचे १९ पुरस्कार मिळाले आहेत.