सांगली : १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या तरुणांनी मतदार यादीत नावे नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सध्या सुरू आहे. त्याअंतर्गत दुबार व समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तांत्रिक त्रुटी हटवल्या जात आहेत. नव्या नोंदी, दुरुस्त्या व हरकती, दावे आदी प्रक्रिया पूर्ण करून ५ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. नव्या नोंदणीसाठी केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे अर्ज उपलब्ध आहेत. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही मतदार यादीत नाव असल्याची खात्री करता येईल. मतदार नोंदणीच्या जनजागृतीसाठी ‘उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी ही माहिती दिली.