शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्का पाटीलची युथ आॅलिम्पिकसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:04 IST

कुरळप : लाडेगाव (ता. वाळवा) गावची सुपुत्री आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अनुष्का रवींद्र पाटील हिची १० मीटर एअर पिस्टल प्रकारात युथ गटात एशियन चॅम्पियन भारताच्या नेमबाजी संघामध्ये निवड करण्यात आली आहे.डॉ. कर्णीशसिंग शूटिंग रेंज नवी दिल्ली येथे सप्टेंबरमध्ये झालेल्या ५ व्या व ६ व्या आंतरराष्ट्रीय ट्रायलमध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी केली. तिला अनुक्रमे ...

कुरळप : लाडेगाव (ता. वाळवा) गावची सुपुत्री आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अनुष्का रवींद्र पाटील हिची १० मीटर एअर पिस्टल प्रकारात युथ गटात एशियन चॅम्पियन भारताच्या नेमबाजी संघामध्ये निवड करण्यात आली आहे.डॉ. कर्णीशसिंग शूटिंग रेंज नवी दिल्ली येथे सप्टेंबरमध्ये झालेल्या ५ व्या व ६ व्या आंतरराष्ट्रीय ट्रायलमध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी केली. तिला अनुक्रमे ४00 पैकी ३७९ व ४00 पैकी ३८१ गुण मिळाले. ती सरासरीमध्ये अव्वल आली आहे. त्यामुळे तिची जपान येथे होणाºया एशियन एअरगन चॅम्पियनशीपसाठी भारताच्या युथ नेमबाजी संघामध्ये निवड झाली आहे. ती सध्या कोल्हापूरच्या विमला गोयंका इंग्लिश मिडीयममध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे.अनुष्काने ५ व्या आंतरराष्ट्रीय ट्रायलमध्ये ४०० पैकी ३७९ गुण व ६ व्या आंतरराष्ट्रीय ट्रायलमध्ये ४०० पैकी ३८१ गुण मिळविले. या २ ट्रायल व पूर्वीच्या ३ ट्रायल अशा ५ ट्रायलच्या सरासरीवर महाराष्ट्राची अनुष्का पाटील हिने हे यश मिळविले. तिच्यासोबत हरियाणाची मनू बाकेर व प्रिया राघव यांची डिसेंबरमध्ये जपान येथे होणाºया एशियन एअरगन चॅम्पियनशीपसाठी भारताच्या युथ नेमबाजी संघामध्ये निवड झाली आहे.या स्पर्धेतून आॅक्टोबर २०१८ मध्ये अर्जेंटिना येथे होणाºया युथ आॅलिम्पिकसाठी आशिया खंडातील प्रथम ४ देशांना प्रत्येकी १, असा कोटा मिळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला युथ गटासाठी अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.अनुष्का सध्या दुधाळी (कोल्हापूर) येथे क्रीडा प्रबोधिनीचे प्रशिक्षक अजित पाटील, प्राचार्य माणिक वाघमारे, तसेच कोल्हापूर मेन, वुमेन रायफल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची तयारी करत आहे. तिला प्राचार्या सायली जोशी, क्रीडा प्रशिक्षक योगेश माने यांचे मार्गदर्शन लाभले. दुधाळी रेंजवरील युवराज साळोखे, जितेंद्र विभुते, विनय पाटील, युवराज चौगुले, दीपक साळोखे, विजय साळोखे यांचेही तिला सहकार्य लाभत आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा