शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकसाठी कोयनेतून आणखी एक टीएमसी पाणी

By admin | Updated: May 1, 2016 00:27 IST

विसर्ग वाढविला : कर्नाटकातील भाजप नेत्यांच्या दबावामुळे निर्णय

मिरज : कोयनेतून एक टीएमसी पाणी सोडण्यात आल्यानंतर कर्नाटकातील भाजप नेत्यांच्या दबावामुळे आणखी एक टीएमसी पाणी कर्नाटकसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकसाठी शनिवारपासून कोयनेतून पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला आहे. कोयनेतून दोन टीएमसी पाणी देण्यात येत असताना कर्नाटकातून अद्याप अक्कलकोटला पाणी सोडण्यात आलेले नाही. कर्नाटक सीमा भागात तीव्र पाणी टंचाईमुळे बुधवारपासून कोयना व वारणा धरणातून एक टीएमसी पाणी सोडण्यात आले. कर्नाटकातील जमखंडीजवळ हिप्परगी धरणापर्यंत हे पाणी पोहोचले. शनिवारी कोयना धरणातून विसर्ग बंद करण्यात येणार होता. मात्र एक टीएमसी पाणी अपुरे असल्याने आणखी एक टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकने केली. जलसंपदा विभागाने कोयना व वारणा धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने व जूनमध्ये पाऊस पडला नाही तर उर्वरित पाणीसाठा आवश्यक असल्याने कर्नाटकला आणखी पाणी देण्यास असमर्थता दर्शविली होती. मात्र आणखी पाण्याच्या मागणीसाठी चिकोडीचे खा. प्रकाश हुक्केरी यांच्यासह कर्नाटकातील शिष्टमंडळाने मुंबईत तळ ठोकला होता. कर्नाटकसाठी आणखी पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे शनिवारपासून कोयनेतून पुन्हा प्रतिसेकंद चार हजार क्युसेक्स वेगाने सोडण्यात येत आहे. आणखी पाणी उपलब्ध झाल्याने कर्नाटकातील सीमाभागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पाणी देताना कर्नाटकातील सिंचन योजनेतून अक्कलकोटला पाणी सोडण्याचे ठरले आहे. मात्र कर्नाटकातून अक्कलकोटला अद्याप पाणी सोडण्यात आले नाही.