शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक विक्रेता ताब्यात

By admin | Updated: March 16, 2017 23:38 IST

म्हैसाळ भ्रूण हत्याकांड : आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे यास गर्भपातासाठी औषध पुरवठा करणाऱ्या आणखी एका औषध वितरकास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. डॉ. खिद्रापुरे याचे साथीदार डॉ. श्रीहरी घोडके, डॉ. रमेश देवगीरीकर यांच्यासह सातजणांच्या पोलिस कोठडीत तीन दिवस वाढ करण्यात आली. पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने शुक्रवारी (दि. १७) डॉ. खिद्रापुरे यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. डॉ. खिद्रापुरे यास अवैध गर्भपातासाठी औषध पुरवठा करणाऱ्या सांगलीतील सुनील खेडेकर, भरत गटागट या औषध विक्रेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील एक औषध वितरक भरत गटागट याच्यामार्फत डॉ. खिद्रापुरे यास प्रतिबंधित औषधांचा पुरवठा करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने मुंबईतील संबंधित औषध वितरकास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेले डॉ. खिद्रापुरे याचे साथीदार डॉ. श्रीहरी घोडके, डॉ. रमेश देवगिरीकर, परिचारिका सौ. कांचन रोजे, उमेश साळुंखे, औषध विक्रेता सुनील खेडेकर, एजंट संदीप जाधव, वीरनगोंडा गुमटे यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा तपास अपूर्ण असल्याने आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने सातही आरोपींच्या पोलिस कोठडीत दि. १९ पर्यंत वाढ केली. गर्भलिंग निदान करणाऱ्या शिरोळ तालुक्यातील डॉक्टरची चौकशी सुरू असून, याप्रकरणी आणखी काहीजणांवर कारवाईची टांगती तलवार आहे. (वार्ताहर)