शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ भ्रूण हत्याप्रकरणी आणखी एकाला अटक

By admin | Updated: March 15, 2017 12:21 IST

म्हैसाळ येथील भ्रूण हत्या प्रकरणात बुधवारी मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला औषध पुरविणा-या भरत नावाच्या आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत

सांगली, दि. 15 -  म्हैसाळ येथील भ्रूण हत्या प्रकरणात बुधवारी मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला औषध पुरविणा-या भरत नावाच्या आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील असून सध्या सांगलीतील बसस्थानक परिसरात रहात होता. दरम्यान, खिद्रापुरे याने रुग्णालयातील गर्भपाताशी संबंधित औषधे कृष्णा नदीत फेकून दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. 
 
म्हैसाळ भ्रूण हत्या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत या प्रकरणात मुख्य संशयित खिद्रापुरे याच्यासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. यात दोन डॉक्टर, चार एजंट, नर्स, कंपाऊंडर, औषध पुरवठा करणा-या इसमाचा समावेश आहे. मणेराजुरीतील विवाहित स्वाती जमदाडेचा गर्भपातावेळी मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. तिच्या पती प्रविण जमदाडे यालाही अटक झाली आहे. त्याच्याकडून बुधवारी मोटारसायकल जप्त करण्यात आली. 
 
भ्रूणहत्येचे प्रकरण समोर येताच खिद्रापुरे गायब झाला होता. फरार होताना त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील औरवाड परिसरात रुग्णालयातील गर्भपाताशी संबंधित औषधे फेकल्याची कबुली दिली आहे. खिद्रापुरे याला औषध पुरविणा-या आणखी एकाचे नाव समोर आले असून त्याला अटक करण्यात आली. अटक केलेल्यांची संख्या बारा झाली आहे. भरत हा मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील असून सध्या तो सांगलीत राहतो. त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.