शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : मंत्राने पाणी गोड करणाऱ्या गुजरातच्या डॉक्टरांना अंनिसचे आव्हान

By संतोष भिसे | Updated: April 14, 2023 18:14 IST

मंत्रांच्या प्रभावाने पाणी गोड करण्याचा दावा करणाऱ्या डॉ. अमरेश मेहता यांना अंनिसने आव्हान दिले आहे.

सांगली : मंत्रांच्या प्रभावाने पाणी गोड करण्याचा दावा करणाऱ्या डॉ. अमरेश मेहता यांना अंनिसने आव्हान दिले आहे. अशा आधुनिक मांत्रिकांचा शासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

गुजरातमधील डॉ. मेहता रविवारी (दि. १६) इनाम धामणी (ता. मिरज) येथे मंत्रांच्या सामर्थ्याने विविध प्रयोग दाखवणार आहेत. पॉवर ऑफ मंत्रा असे कार्यक्रमाचे नाव आहे. मंत्राद्वारे साधे पाणी गोड करणे, दूर अंतरावरी पापड मोडणे असे प्रयोग करणार आहेत. मंत्रांच्या शक्तीने अनेक आजारही बरे होतात असा त्यांचा दावा आहे.त्यांना अंनिसने आक्षेप घेतला आहे. हे दावे अवैज्ञानिक दावे असून मंत्र-तंत्र विद्या ही अवैज्ञानिक संकल्पना आहे असे अंनिसने स्पष्ट केले. डाॅ. प्रदीप पाटील म्हणाले की, मंत्रांत कोणतेही सामर्थ्य नसते. डॉ. मेहता यांनी मंत्रांचे सामर्थ्य सिद्ध करावे. मानवी देहाभोवती आभामंडळ असते हा दावाही सिद्ध करुन दाखवावा. मंत्रसामर्थ्याने अपत्यप्राप्ती होते हेदेखील सिद्ध करावे. मंत्रांच्या सामर्थ्यावर खुली चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात आम्हाला संधी द्यावी.

राहुल थोरात  म्हणाले, कोणत्याही धर्माला आमचा विरोध नसून धर्माच्या नावाने अवैज्ञानिकता पसरविणास विरोध आहे. डाॅ. संजय निटवे म्हणाले, शरीरात सात चक्रे असतात याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.ॲड. धनंजय मद्वान्ना, ॲड. अजित सूर्यवंशी म्हणाले, अशा आधुनिक मांत्रिकांवर शासनाने कठोर कारवाई करावी. रुग्णांच्या जीवाशी खेळ थांबवावा.

यावेळी बाळासाहेब पाटील, जगदीश काबरे, ज्योती आदाटे, त्रिशला शहा, आशा धनाले, तेजस्विनी सूर्यवंशी, प्रियांका तुपलोंढे, फारुख गवंडी आदी उपस्थित होते.

टक्केवारी वाढते, आवडती व्यक्ती जवळ येते

डॉ. मेहता यांनी चित्रफितींद्वारे मंत्रसामर्थ्याचे अनेक दावे केले आहेत. प्रजनन समस्या, नि:संतानता, त्वचारोग, गर्भरक्षा, काळी जादू व नजर लागणे आदी कारणांसाठी मंत्रांची ताकद वापरता येते असा त्यांचा दावा आहे. आवडत्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठीचा मंत्रही त्यांच्याकडे आहे. मंत्र म्हंटल्याने परीक्षेची टक्केवारी वाढते, ५० टक्के गुण मिळविणारे ९० टक्क्यांपर्यंत जातात, स्मरणशक्ती वाढते, मतिमंदांची बुद्धी ८० टक्के सुधारते, उच्च रक्तदाब नियंत्रित होतो, थायरॉईड ठिक होतो असेही अनेक दावे त्यांनी केले आहेत.