शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

अंकलीतील पाईप चोरीचा अखेर छडा

By admin | Updated: June 25, 2015 22:48 IST

तिघांना अटक : घरावर छापे; कसून चौकशी; तीन लाखांचा माल जप्त

सांगली : अंकली (ता. मिरज) येथील जैन ड्रीप इरिगेशन या पाईप विक्रीच्या गोदामात झालेल्या पाईप चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. ही चोरी तिघांच्या टोळीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरलेल्या तीन लाख १५ हजाराच्या विविध आकाराच्या पाईपचे १५० बंडल जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेल्यांत महेश गुंडाप्पा ऐवळे (वय २२), रत्नाकर ऊर्फ बाबू मधुकर कोलप (३२, दोघे रा. अंकली) व शीतल सुरेश परीट (२७, उदगाव, ता. शिरोळ) यांचा समावेश आहे. गोदामाच्या भिंतीवरुन येऊन तिघांनी पाईपचे १५० बंडल चोरुन नेले आहेत. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. तो गेल्या आठवड्यात उघडकीस आला होता. याबाबत नितीन शिराळकर यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांचे पथक दोन दिवसांपूर्वी अंकली परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी हे तिघेही संशयितरित्या फिरताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी पाईप चोरल्याची कबुली दिली. या पाईप त्यांनी अंकलीत भाड्याची खोली घेऊन तेथे ठेवल्या होत्या. तिथे छापा टाकून या पाईप जप्त केल्या. याशिवाय त्यांनी बोरगाव (कर्नाटक) येथेही काही प्रमाणात पाईप विकल्या होत्या. त्याही जप्त केल्या आहेत. (प्रतिनिधी)