शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अनिल बाबर यांच्या भूमिकेने तासगावच्या २१ गावांत त्रांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 23:31 IST

दत्ता पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क तासगाव : आमदार अनिल बाबर यांनी लोकसभा निवडणुकीला भाजपला सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट ...

दत्ता पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : आमदार अनिल बाबर यांनी लोकसभा निवडणुकीला भाजपला सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र त्यांच्या या भूमिकेने खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश असणाऱ्या तासगाव तालुक्यातील २१ गावांत राजकारणाचे मोठे त्रांगडे निर्माण झाले आहे. या गावांतील राष्टÑवादीच्या कारभाºयांचे आमदार बाबरांशी सख्य आहे. मात्र भाजपशी तितकेच वितुष्ट आहे. आमदार बाबरांच्या निर्णयाने राष्टÑवादीचे कारभारी कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.तासगाव तालुक्यातील विसापूर आणि मांजर्डे जिल्हा परिषद गटातील २१ गावांचा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. गतवेळच्या निवडणुकीचा अपवाद वगळता, या २१ गावांतील राष्टÑवादीचा किंबहुना आबाप्रेमींचा आमदार अनिल बाबर यांना भक्कम पाठिंबा राहिला आहे. गतवेळच्या निवडणुकीत राष्टÑवादीच्या काही कारभाºयांनी आर. आर. पाटील यांच्या आदेशानुसार राष्टÑवादीचे उमेदवार अमरसिंह देशमुख यांचे काम केले होते. मात्र त्यानंतर या सर्कलमधील राष्टÑवादीच्या सर्वच कारभाºयांनी आमदार बाबर यांच्याशी जुळवून घेतले. किंबहुना गेल्या चार वर्षात आमदार बाबर यांनीही पाठबळ देत कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली.आमदार बाबर यांची तासगाव तालुक्यातील २१ गावांशी सलगी असतानाच, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात भाजपकडून खासदार संजयकाका पाटील यांची लोकसभेसाठीची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे बाबरांच्या भूमिकेनुसार खासदार संजयकाकांनाच पाठिंबा दिला जाईल हे स्पष्ट आहे.नेमकी हीच भूमिका विसापूर सर्कलच्या राष्टÑवादीच्या कारभाºयांचे त्रांगडे करणारी ठरली आहे. तासगाव तालुक्यात आबा गट आणि काका गट यांचे परंपरागत विळ्या-भोपळ्याचे सख्य राहिले आहे. प्रत्येक निवडणुकीत दोन्ही गोटात टोकाचा संघर्ष आणि कुरघोडीचे राजकारण सुरुच असते. त्यामुळे आमदार बाबरांच्या भूमिकेने लोकसभेपुरती २१ गावांतील राष्टÑवादीची भूमिका काय राहणार, याची उत्सुकता आहे.मर्जी विधानसभेपुरतीच?आमदार अनिल बाबर यांच्यावर २१ गावांतील राष्टÑवादीच्या कारभाºयांची मर्जी आहे. मात्र ही मर्जी विधानसभा निवडणुकीपुरतीच असेल अशी चर्चा आहे. राष्टÑवादीकडून किंबहुना आमदार सुमनतार्इंकडून जो आदेश येईल, त्यानुसारच लोकसभा निवडणुकीची भूमिका अवलंबून असेल असे बोलले जात आहे. मात्र लोकसभेला आमदार बाबर आणि खासदार संजयकाकांची सलगी झाल्यास, पुढची वाटचाल कशी असेल, यावरच या २१ गावांची राजकीय दिशा ठरणार आहे.