शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

अनिकेतचा मृत्यू पूर्वनियोजित खूनच --कोठडीत मारले.. आंबोलीत जाळले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:15 IST

अनिकेत कोथळेचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू हा युवराज कामटे व त्याच्या साथीदारांनी संगनमताने कट रचून केलेला प्री-प्लॅनड् मर्डरच (पूर्वनियोजित खून) आहे, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल

ठळक मुद्देउज्ज्वल निकम : दोघा संशयितांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद; १८ रोजी निर्णय होणार

सांगली : अनिकेत कोथळेचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू हा युवराज कामटे व त्याच्या साथीदारांनी संगनमताने कट रचून केलेला प्री-प्लॅनड् मर्डरच (पूर्वनियोजित खून) आहे, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी जिल्हा न्यायालयात केला.

अनिकेत कोथळे याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह पोलिसांनी आंबोली घाटात नेऊन जाळला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज बजरंग कामटे (वय ४०, रा. स्फूर्ती चौक), हवालदार अनिल श्रीधर लाड (५२, रा. यशवंतनगर), अरुण विजय टोणे (४८, रा. विश्रामबाग), नसरुद्दीन बाबालाल मुल्ला (३०), गाडीचालक राहुल शिवाजी शिंगटे (४१, बालाजीनगर, सर्व रा. सांगली) यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल आहे, तर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल या पाच पोलिसांसह ११ जण निलंबित आहेत.

अटकेतील झिरो पोलीस झाकीर नबीलाल पट्टेवाले व जीपचालक राहुल शिंगटे यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलेला होता. या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांच्या न्यायालयात बुधवारी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला. सरकार पक्षाला जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे, सीआयडीचे मुकुंद कुलकर्णी यांनी मदत केली. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. दीपक शिंदे, विकास पाटील व किरण शिरगुप्पे यांनी काम पाहिले.निकम त्यांच्या युक्तिवादात म्हणाले, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. अमोल भंडारे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्यासह आठ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी अनिकेतला अमानुष मारहाण केल्याचे जबाब दिले आहेत. प्रत्येक संशयिताचा सहभाग त्यातून निष्पन्न होतो. जर संशयितांना जामीन दिल्यास ते साक्षीदारावर दबाव व तपासात अडथळे आणू शकतात. संरक्षकच जर गुन्हेगारी करू लागले, तर सर्वसामान्यांनी दाद कोणाकडे मागायची?, असा प्रश्न निकम यांनी उपस्थित केला.

बचाव पक्षाने कॉल डिटेल्स व कागदपत्रांची मागणी केली. त्यावर निकम म्हणाले की, कॉल डिटेल्स हा तपासाचा भाग आहे. ते डिटेल्स बचाव पक्षाला देण्यास सरकार पक्षाचा विरोध आहे. तसेच कागदपत्र मागणी अर्जाबाबत त्यांनी सहमती दर्शवली. जी कागदपत्रे तपास कामात लागतील, त्याच्या प्रति तपास अधिकाऱ्यांना देण्यास सरकार पक्ष तयार आहे; परंतु तपासाव्यतिरिक्त त्या काळातील स्टेशन डायरी, लॉकअप डायरी अशा स्वरूपाची कागदपत्रे देता येणार नाहीत. तपास कामातील मूळ कागदपत्रे सरकार पक्षाकडेच राहतील, असा युक्तिवाद त्यांनी केला.

बचाव पक्षाच्यावतीने अ‍ॅड. दीपक शिंदे म्हणाले की, झाकीर पट्टेवाला हा या गुन्ह्यामध्ये कोठेही सहभागी असल्याचे दिसत नाही. केवळ पोलीस अधिकाºयांच्या सांगण्यावरून बेशुध्द व नग्न अवस्थेतील अनिकेतला कपडे घालण्यास मदत केली, हा काही गुन्हा होऊ शकत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. यावर आता १८ रोजी निर्णय होणार आहे.