शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अनिकेत कोथळे खून प्रकरण;आठ पोलिसांचा चौकशी अहवाल गुलदस्त्यातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 23:59 IST

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीतील बहुचर्चित अनिकेत कोथळे खून प्रकरणात कारवाई करण्यात आलेल्या आठ पोलिसांचे निलंबन अजूनही कायम आहे. यामध्ये तीन महिला पोलिसांचा समावेश आहे. ‘सीआयडी’ने या सर्वांची चौकशी करुन जबाब नोंदवून घेतले आहेत. या घटनेला दहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे, पण अजूनही ...

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीतील बहुचर्चित अनिकेत कोथळे खून प्रकरणात कारवाई करण्यात आलेल्या आठ पोलिसांचे निलंबन अजूनही कायम आहे. यामध्ये तीन महिला पोलिसांचा समावेश आहे. ‘सीआयडी’ने या सर्वांची चौकशी करुन जबाब नोंदवून घेतले आहेत. या घटनेला दहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे, पण अजूनही निलंबित पोलिसांबाबतचा चौकशी अहवाल सादर होऊ शकला नाही.सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबर २०१७ रोजी लुटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी अनिकेतचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळण्यात आला होता. याप्रकरणी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, रोहित शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला, झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले यांच्यासह कामटेचा मामेसासरा बाबासाहेब कांबळे यास अटक केली होती. सरकारतर्फे या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमोल भंडारे हा या घटनेतील मुख्य साक्षीदार आहे. त्यालाही पोलिस संरक्षण द्यावे लागले आहे. तीन महिन्यांपूर्वी तो लुटमारीच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर आला आहे.अनिकेत कोथळे प्रकरण राज्यभर गाजले. मंत्र्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगलीत यावे लागले. घटनेदिवशी रात्र ड्युटीवरील आठ पोलिसांना दोषी धरुन ंिनलंबित करण्यात आले. त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. अनिकेतचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने हा तपास सीआयडीकडे आला. रात्र ड्युटीवर असलेले पोलीस या घटनेतील महत्त्वाचे साक्षीदार होते. सीआयडीने त्यांना चौकशीच्या पिंजºयात उभे केले. महिनाभर त्यांची चौकशी झाली. सीआयडीने संशयितांविरुद्ध तीन महिन्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या घटनेला दहा महिने पूर्ण झाले आहेत. पोलिसांचे निलंबन कायम असून, त्यांच्या चौकशी अहवालाची काय झाले, याबाबत गोपनियता बाळगण्यात आली आहे.दरम्यान, कोथळे खून खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल, अशी घोषणा गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी सांगलीतच केली होती. पण या घोषणेची अजूनही प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. अटकेतील काही संशयितांनी वकीलही दिलेला नाही. त्यामुळेही हे प्रकरण लांबले गेले आहे.उपनिरीक्षकासह दोघांविरुद्ध गुन्हानिलंबित केलेल्या आठही पोलिसांना तीन महिने पन्नास टक्के पगार सुरु होता. त्यानंतर आता ७५ टक्के पगार दिला जात आहे. या प्रकरणात दोन महिन्यापूर्वी पोलीस उपनिरीक्षकांसह एक पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर अजून पुढील खात्यांतर्गत कोणतीही कारवाई झालेली नाही. दोषारोपपत्रातील संशयितांमध्ये त्यांचाही समावेश करण्यात आला आहे.