शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णेतील पाण्यावर कर्नाटकात ऐनापूर सिंचन योजनेला सुरुवात

By admin | Updated: July 22, 2016 00:03 IST

सांगली जिल्हा वंचितच : सीमावर्तीय गावांना फायदा

सदानंद औंधे -- मिरज --कृष्णा नदीतील वाहून जाणारे पाणी उचलण्यासाठी कर्नाटकात ऐनापूर जलसिंचन योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सीमा भागातील लोकूर, मंगसुळी, केंपवाड, मदभावीसह १५ गावांत कालव्याद्वारे पाणी पोहोचले असून अनेक गावांतील तलाव भरण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यात मात्र, कर्नाटकात वाहून जाणारे पाणी ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनेद्वारे दुष्काळी भागात नेण्याबाबत केवळ चर्चा व ठरावच सुरू आहेत. कर्नाटक सीमाभागात एप्रिल, मे महिन्यात नदीपात्र कोरडे पडल्याने कागवाड ते जमखंडीपर्यंत नदीकाठावरील शंभर गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. उगार व कुडची येथे नदीपात्रात पाण्याचा खडखडाट असल्याने, नदीच्या दोन्ही काठावरील कुडची, उगार, जुगूळ, शिरगुप्पी, ऐनापुर, कृष्णाकित्तूर यांसह अनेक गावांत नळपाणी योजना बंद पडल्या होत्या. पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. शिरोळजवळ राजापूर येथील बंधाऱ्यापुढे कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडल्याने तीव्र पाणीटंचाई झाल्याने, वारणा व कोयना धरणातून दोन टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. मात्र जुलै महिन्यात महाराष्ट्रात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसाने ही परिस्थिती बदलली आहे. सध्या कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असून जमखंडीजवळ सहा टीएमसी क्षमता असलेले कृष्णा नदीवरील हिप्परगी धरण पूर्ण भरले आहे. कृष्णा नदीतून वाहणारे पाणी उचलण्यासाठी ऐनापूर येथील सिंचन योजना ५ जुलैपासूनच सुरू करण्यात आली असून, पाच पंपांद्वारे प्रति सेकंद ३०० क्युसेक पाणी उपसा करण्यात येत आहे. हे पाणी कालव्याद्वारे मदभावी, लोकूर, मंगसुळी, केंपवाडसह १५ गावांत पोहोचले आहे. मंगसुळी व मदभावी येथील तलाव भरण्यात येत आहेत. सीमा भागातील या अवर्षणग्रस्त गावांतील तलाव भरल्याने येथील पाणीटंचाई दूर होणार आहे. ऐनापूर योजनेची सिंचन क्षमता २७ हजार हेक्टर क्षेत्राची आहे. वाहून जाणाऱ्या पाण्याचा पुरेपूर वापर करून लाभक्षेत्रातील गावांत पाणी सोडले जात आहे. मात्र सांगली जिल्ह्यात टेंभू, ताकारी व म्हैसाळ योजनेबाबत चर्चेचे गुऱ्हाळच सुरू असल्याने, कृष्णा नदीतून कर्नाटकात पाणी वाहून जात आहे.