फोटो- इस्लामपूर येथे आनंदराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथाश्रमातील मुलांना मदत देण्यात आली. यावेळी सागर मलगुंडे, राजेंद्र पवार, प्रतिभा शिंदे, राहुल टिबे, अंकुश माने उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील पालिकेचे नगरसेवक आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. रुग्णांना फळेवाटप, अनाथाश्रमातील मुलांना शालेय साहित्य आणि अन्नदान करण्यात आले.
इस्लामपूर शहरासह तालुक्यात शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी गरजूंना मदत केली. शहरप्रमुख, नगरसेवक शकील सय्यद, प्रदीप लोहार यांनी उपजिल्हा रुग्णालयात कोविड उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळे वाटप केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. एन.आर. देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे शिवसेनेकडून कौतुक करण्यात आले.
सेनेच्या महिला आघाडीप्रमुख, नगरसेविका प्रतिभा शिंदे यांनी अनाथाश्रमातील मुला-मुलींना मिठाई वाटप केले, तसेच गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत दिली. तालुकाप्रमुख सागर मलगुंडे, अंकुश माने, राहुल टिबे यांनी अनाथाश्रमात विद्यार्थ्यांना दैनंदिन वापराच्या साहित्याचे वाटप केले, तसेच १२५ किलो तांदूळ मदत स्वरूपात दिला.
यावेळी राजेंद्र पवार, पुरवठा निरीक्षक बबन करे, मदन महाजन, सचिन पाटील, संग्राम पाटील, शिवकुमार शिंदे, योगेश हुबाले, राजेश पाटील, महेश महाजन, अनंत नाईक, धनाजी दुरुगडे, संजय गायकवाड, सुभाष जाधव, अतुल सूर्यवंशी, शिवराज पुजारी, विजय डांगे, प्रीतम काळे, अशपाक जमादार, वैभव गायकवाड उपस्थित होते.