शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पूरबाधितांना 9318 जीवनोपयोगी वस्तुंचे किट व अन्य मदत साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 11:28 IST

पूरबाधित लोकांना जीवनोपयोगी साहित्याचे वितरण प्रशासनातर्फे करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.

ठळक मुद्देपूरबाधितांना 9318 जीवनोपयोगी वस्तुंचे किट वाटपपूरग्रस्तांना तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत औषधे

सांगली : पूरबाधित लोकांना जीवनोपयोगी साहित्याचे वितरण प्रशासनातर्फे करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.

 प्रशासनातर्फे दिनांक 22 ऑगस्ट पर्यंत 9 हजार 751 बिस्कीट पाकीटे, 69 हजार 797 पिण्याचे पाणी बॉक्स, 415 किलो दूध पावडर पाकिटे, 194 डझन मेणबत्या, 43 हजार 441 भोजन पाकिटे, 35 हजार 411 किलो रवा, साखर, आदि अन्नधान्याचे वाटप, 9 हजार 318 जीवनोपयोगी वस्तुंचे किट, 8 हजार 560 भांड्यांचे किट यांचे वाटप करण्यात आले आहे.सांगली येथील प्राप्त जनरल औषधे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत पूरग्रस्तांना देण्यात येत आहेत. तसेच जनावरांची औषधे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत पूरग्रस्तांना देण्यात येत आहेत. तहसिलदार कार्यालय मिरज, पलूस व वाळवा येथे प्राप्त जनरल औषधे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत पूरग्रस्तांना देण्यात येत आहेत.सानुग्रह अनुदान वितरण प्रक्रिया त्वरीत पूर्ण करा : गोपीचंद कदममहापुरामुळे सांगली शहर व जिल्ह्यातील विविध भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाधित लोकांना तातडीची मदत म्हणून शासन शहरी भागात 15 हजार तर ग्रामीण भागात 10 हजार रूपये सानुग्रह अनुदान वाटप करीत आहे.

यातील 5 हजार रूपये रोखीने वितरीत करण्यात येत आहेत. 22 ऑगस्ट अखेर 60 हजार 356 कुटुंबाना 30 कोटी 17 लाख 80 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. कोणत्याही स्थितीत सानुग्रह अनुदान वितरण प्रक्रिया त्वरीत पूर्ण करा. बाधित कोणतेही कुटुंब वंचित राहणार नाही याची काटेकोर दक्षता घ्या, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिले.अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी मिरज तहसील कार्यालयामध्ये सानुग्रह अनुदान वितरणामध्ये सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार शरद पाटील, शिल्पा ठोकडे, कल्पना ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम म्हणाले, महापुरामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेकांची घरे, संसार उध्वस्त झाले आहेत. महसूल विभागाशी संबंधित सर्व पंचनामे तातडीने पूर्ण करा. यंत्रणा अधिक गतीमान करा. सकाळी लवकर कामाला सुरूवात करा व रात्री उशिरापर्यंत कामे सुरू ठेवा. प्रत्येक पूरबाधिताला लवकरात लवकर मदत मिळेल यासाठी कसोसीने प्रयत्न करा. ज्या ठिकाणी गरीब वस्त्या आहेत त्या ठिकाणी सानुग्रह अनुदान वितरणाला प्राधान्य द्या.विविध विस्तार योजना वितरकामार्फतअनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळेसांगली, दि. 23 (जि.मा.का.) : महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत सन 2019-20 मध्ये विविध विस्तार योजनेंतर्गत सांगली जिल्ह्याकरीता वितरकामार्फत अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणाचे लक्षांक प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांनी नजिकच्या महाबीज वितरकामार्फत अनुदान वजा जाता शेतकरी हिस्सा आदा करून बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे यांनी केले आहे.श्री. साबळे म्हणाले, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत रब्बी हंगामात हरभरा या पिकाचे जिल्ह्यात 10 वर्षाच्या वरील प्रमाणित बियाणे किंमतीच्या 50 टक्के किंवा 2500 रूपये प्रति क्विंटल या प्रमाणे अनुक्रमे 278 क्विंटल वाटपाचे तसेच 10 वर्षाच्या आतील बियाणे किंमतीच्या 50 टक्के किंवा 5 हजार रूपये प्रति क्विंटल या प्रमाणे 561 क्विंटल लक्षांक आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगामात ज्वारी या पिकाचे संकरीत वाणाचे 10 वर्षाच्या आतील प्रमाणित बियाणे किंमतीच्या 50 टक्के किंवा 10 हजार रूपये प्रति क्विंटल या प्रमाणे अनुक्रमे 65 क्विंटल लक्षांक आहे. तसेच सुधारीत वाणाचे ज्वारी या पिकाचे 10 वर्षाच्या आतील प्रमाणित बियाणे किंमतीच्या 50 टक्के किंवा 3 हजार रूपये प्रति क्विंटल या प्रमाणे अनुक्रमे 329 क्विंटल लक्षांक आहे. तसेच सुधारीत वाणाचे ज्वारी या पिकाचे 10 वर्षाच्या वरील प्रमाणित बियाणे किंमतीच्या 50 टक्के किंवा 1500 रूपये प्रति क्विंटल याप्रमाणे 415 क्विंटल लक्षांक आहे.00000

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरcollectorजिल्हाधिकारी