शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सभा गुंडाळल्याचा विरोधकांचा आरोप

By admin | Updated: August 31, 2014 23:37 IST

शिक्षक बँक सभा : संघानेच गोंधळ घातल्याची सत्ताधाऱ्यांची टीका

सांगली : शिक्षक बँकेची सभा सत्ताधारी समितीनेच गुंडाळून पळ काढल्याचा आरोप शि. द. पाटील व संभाजी थोरात गटाने केला आहे, तर सभेचे कामकाज शांततेने करण्याचे आवाहन करूनही विरोधकांनी गोंधळ घालून गालबोट लावल्याची टीका समितीचे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड यांनी केली आहे. शिक्षक बँकेची सभा प्रचंड गोंधळात अवघ्या दहा मिनिटातच संपली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना तीनही संघटनांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. सत्ताधारी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड म्हणाले की, बँकेचे अध्यक्ष धानाप्पा माळी यांनी सुरुवातीलाच सभा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले होते. तसेच सभासदांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची तयारीही दर्शविली होती. तरीही विरोधकांनी गोंधळ घातला. शि. द. पाटील व संभाजी थोरात या दोन्ही गटाचे जिल्ह्यातील अस्तित्व संपुष्टात आले आहे. हे अस्तित्व दाखविण्यासाठी गोंधळ माजविला गेला. पण त्यांना सभासद जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत.थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष व संचालक विनायक शिंदे म्हणाले की, गेल्या सभेच्या इतिवृत्तात बेकायदेशीररित्या नोकरभरतीचा आकृतीबंध वाढविण्यात आला होता. त्याचा जाब विचारण्याचा निर्धार संघाने केला होता. सत्ताधारी व त्यांच्या नेत्यांची घरे भरण्यासाठी हा उपद्व्याप केला गेला आहे. तसेच लाभांश वाटपातही विश्वासघात केला आहे. या साऱ्यावर समितीकडे कोणतेच उत्तर नव्हते. सभासदांनी आकृतीबंध नामंजूर केला, तेव्हा त्यांनी सभेतून पळ काढला. सत्ताधाऱ्यांनीच गोंधळ घालून गालबोट लावले आहे. त्यामुळे ही सभा झालेली नाही, असा दावा केला. संघप्रणित तरुण मंडळाचे अध्यक्ष विकास शिंदे म्हणाले की, बँकेत भ्रष्टाचार व बेकायदेशीर कामे सुरू आहेत. संचालकांना अपात्र ठरविण्याचे कटकारस्थान सुरू आहे. ते व्याजदर कमी करू शकलेले नाहीत. लाभांशही कमी दिला आहे. या अन्यायाविरोधात पाटील गटाने जोरदार आक्षेप घेतला. संचालकांना दहा प्रश्नही विचारले होते. पण त्यांचे साधे उत्तरही त्यांनी दिलेले नाही. त्यामुळेच आम्ही समांतर सभा घेऊन निषेध केला आहे. (प्रतिनिधी)पदवीधर प्राथमिक शिक्षक सभेचा बहिष्कारअनावश्यक नोकरभरती, संचालकांची उधळपट्टी याच्या निषेधार्थ पदवीधर प्राथमिक शिक्षक सभेने आजच्या वार्षिक सभेवर बहिष्कार टाकला होता. सभेत विद्यमान संचालकांनीच गोंधळ घालणे अशोभनीय आहे. या प्रकारामुळे शिक्षकांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. समितीने व्याजदर कमी करण्याचे आश्वासनही पाळलेले नाही. या साऱ्या गोष्टींचा पदवीधर संघटना निषेध करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव भोसले यांनी सांगितले.