शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

इस्लामपुरात राष्ट्रवादीचे तिन्ही गट एकत्र

By admin | Updated: August 26, 2016 01:15 IST

आज दहीहंडीचे आयोजन : महाडिक युवा शक्तीची सावध भूमिका; शहराचे लक्ष

अशोक पाटील-- इस्लामपूर पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये तीन गट सक्रिय आहेत. त्यांच्यामध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. परंतु आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी महाडिक युवा शक्तीला शह देण्यासाठी हे तिन्ही गट एकवटले आहेत. राष्ट्रवादीच्यावतीने यंदा महाडिक युवाशक्तीच्या दहीहंडीपूर्वीच जयंत दहीहंडीचे आयोजन करून आघाडी घेतली आहे. त्यामुळे महाडिक युवा शक्तीने सावध भूमिका घेत राष्ट्रवादीच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे.गेल्या तीस वर्षांत पालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद अनेकवेळा चव्हाट्यावर आले आहेत. माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांना हे माहीत असतानाही त्यांनी यामध्ये कसलाही हस्तक्षेप न करता सर्व काही आलबेल ठेवले आहे. जरी सत्ताधाऱ्यांमध्ये वाद असले तरी ऐन निवडणुकीच्या काळात पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व एकत्र येऊन विरोधकांना शह देण्यात यशस्वी होतात.पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी कंबर कसली आहे. नुकतेच अंबिका उद्यानाच्या उद्घाटनासाठी सैराट फेम ‘आर्ची’ला आमंत्रित करून गर्दी खेचली होती. या गर्दीचा धसका विरोधकांनी घेतला असतानाच, पुन्हा एकदा महाडिक युवा शक्तीला शह देण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली आहे. यापूर्वी महाडिक युवाशक्तीची दहीहंडी प्रथम फुटायची. त्याला शह देण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून जयंत दहीहंडीचे आयोजन करण्यात येत होते. यंदा मात्र महाडिक युवाशक्तीच्या दहीहंडीपूर्वीच राष्ट्रवादीने जयंत दहीहंडीचे आयोजन करून आघाडी घेतली आहे.महाडिक युवाशक्तीनेही दहीहंडी जोरदार साजरी करण्याचे नियोजन केले होते. यासाठी कार्यकारिणीची निवडही करण्यात आली होती. परंतु दहीहंडी फोडण्यासाठी लावण्यात येणारे गोविंदांचे थर २0 फुटापेक्षा जास्त असू नयेत, या न्यायालयाच्या आदेशामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे दहीहंडीचे नियोजन ठप्पच झाले. त्यांचे लक्ष आता राष्ट्रवादीच्या दहीहंडीकडे आहे. त्यांना किती प्रतिसाद मिळतो, यावरच महाडिक युवा शक्तीची पावले पडतील.पालिका निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली असतानाही विरोधकांत एकी नाही. त्यामुळे महाडिक युवाशक्ती स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा करत आहे. इतरांनीही आपापली ताकद अजमावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विरोधकांच्या मोर्चेबांधणीला यश येणार का?दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोधकांची एकत्रित मोट बांधण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यात त्यांना कितपत यश मिळणार, हे लवकरच दिसणार आहे.