शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
8
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
9
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
10
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
11
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
12
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
13
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
14
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
15
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
16
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
17
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
18
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
19
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
20
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी

Lok Sabha Election 2019 शहरी मतदारांचा कौल मिळविण्यास तिन्ही उमेदवारांमध्ये लागली स्पर्धा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 23:42 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली लोकसभा मतदार संघात विस्ताराने ग्रामीण भाग मोठा असल्याने उमेदवारांची येथे ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली लोकसभा मतदार संघात विस्ताराने ग्रामीण भाग मोठा असल्याने उमेदवारांची येथे प्रचार करताना दमछाक होत आहे. दुसरीकडे विस्ताराने कमी, पण लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या शहरी भागातील मतदारांवर उमेदवारांची विशेष नजर आहे. त्यामुळे भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना व वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांचा प्रचाराचा धडाका प्रमुख शहरांमध्ये अधिक दिसत आहे.सांगली लोकसभा मतदार संघातील शहरी भागांचा विचार केला, तर सर्वाधिक मतदान हे सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात आहे. ४ लाख १0 हजार ५१0 इतकी मतदार संख्या आहे. महापालिका क्षेत्र वगळता तासगाव, विटा, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव या शहरी भागात १ लाख ४९ हजार ९६८ मतदार आहेत. म्हणजे अन्य शहरांच्या तुलनेत महापालिका क्षेत्रातील मतदारांची संख्या अधिक आहे. ग्रामीण व शहरी भागातील मतदारसंख्येची तुलना केल्यास, ग्रामीण मतदारसंख्या ६८.७३ टक्के, तर शहरी मतदारसंख्या ही ३१.२७ टक्के इतकी होते. तरीही शहरी भागातील मतदारांचा कौल मिळविण्यासाठी आता येथील उमेदवारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी प्रचाराची सर्वाधिक यंत्रणा ही शहरी भागात राबविली आहे. ग्रामीण भागात भेटीगाठी, सभा, बैठका असे कार्यक्रम घेतले जात आहेत. दुसरीकडे प्रचाराचे नवनवे फंडे शोधून शहरी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे याठिकाणी उमेदवाराला जास्त कसरत करावी लागत आहे. तरीही शहरातील नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमार्फत शहरात प्रचार यंत्रणा राबविणे उमेदवारांना तितके अडचणीचे ठरत नाही.कोणत्या भागातकोणाचा आहे होल्ड?मुस्लिमबहुल असलेल्या मिरज शहरात काँग्रेसचा सर्वाधिक प्रभाव राहिला आहे. त्यामुळेच गत लोकसभा निवडणुकीत याठिकाणी अन्य शहरांपेक्षा मिरजेत काँग्रेसला अधिक मते मिळाली होती.महापालिका निवडणुकीत याठिकाणी भाजपला ३५.१३, तर काँग्रेस व राष्टÑवादीला मिळून ३६.२७ टक्के मतदान मिळाले होते. म्हणजेच हे दोन्ही गट तुल्यबळ आहेत. त्यामुळे येथे जोरदार रस्सीखेच होत आहे.विटा येथे काँग्रेसचे, आटपाडीत महायुतीचे, पलूस व कडेगाव येथे काँग्रेसचे, तर जत, तासगाव, कवठेमहांकाळ या शहरात महायुती व महाआघाडी तुल्यबळ आहे.शहर भाजप काँग्रेससांगली ७९,६१0 ६६१२0मिरज ४८३७२ २९९२८कुपवाड १९३२0 ११५0८तासगाव १0४२१ ५११४विटा ९,४२५ ६५५१आटपाडी ३६५७ ३0१३जत ७९१७ ३७१२कवठेमहांकाळ ३६२५ २३0८पलूस ६0३८ २८0७कडेगाव २८५६ २१७९एकूण १९४७३0 १३५३८२

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक