शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारच्या सर्व योजना अपयशी : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 22:12 IST

भाजप सरकारच्या सर्व योजना अपयशी ठरत आहेत. यात सरकारचे नाकर्तेपण खूप मोठे असून, नुसत्या घोषणांचा पाऊस पाडण्याचे काम भाजप सरकार करत आहे. शासनाच्या विविध योजनांच्या बाबतीत जनतेमध्ये संभ्रमावस्था आहे.

ठळक मुद्देकवठेमहांकाळला राष्टÑवादीची बैठक; विविध सेलच्या पदाधिकारी निवडी२८ गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी ताकदीने काम करानवीन संधी देण्यात आलेल्या सर्व सेलच्या पदाधिकाºयांनी दिलेल्या संधीचे सोने करावे. शासनाच्या विविध योजनांच्या बाबतीत जनतेमध्ये संभ्रमावस्था आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककवठेमहांकाळ : भाजप सरकारच्या सर्व योजना अपयशी ठरत आहेत. यात सरकारचे नाकर्तेपण खूप मोठे असून, नुसत्या घोषणांचा पाऊस पाडण्याचे काम भाजप सरकार करत आहे. शासनाच्या विविध योजनांच्या बाबतीत जनतेमध्ये संभ्रमावस्था आहे. शासनाच्या विविध घोषणांमधील दोष दाखवून राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी ताकदीने प्रयत्न करावेत, असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले.

कवठेमहांकाळ तालुक्यातील विविध सेलच्या तालुकाध्यक्ष व पदाधिकारी निवडीप्रसंगी आयोजित राष्टÑवादीच्या बैठकीत ते बोलत होते.आ. जयंत पाटील म्हणाले, आगामी ग्रामपंचायत निवडणुकांना पूर्ण ताकदीनिशी सामोरे जाण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. सर्वच जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीने राष्टÑवादीचे काम करावे. निष्ठावंताला नक्कीच संधी दिली जाईल.

आ. सुमनताई पाटील म्हणाल्या, आगामी ग्रामपंचायत निवडणूक राष्टÑवादी पक्षाच्या चिन्हावर लढवायची आहे. स्वबळावर निवडणुका जिंकून राष्टÑवादीची ताकद व दलबदलू लोकांना त्यांची जागा दाखवून देऊया. नवीन संधी देण्यात आलेल्या सर्व सेलच्या पदाधिकाºयांनी दिलेल्या संधीचे सोने करावे.

महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे म्हणाल्या, आबांचे व अण्णांचे विचार जपण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आर. आर. आबा व विजयअण्णा यांचे विचार जपण्यासाठी युवकांनी जास्तीत जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. युवकच राष्टÑवादीचे तारणहार आहेत. त्यामुळे आगामी २८ गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी ताकदीने काम करा.युवकचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, नगराध्यक्षा साधना कांबळे, गणेश पाटील, मोहन खोत, टी. व्ही. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी

जिल्हा बॅँकेचे संचालक सुरेश पाटील, सभापती मनोहर पाटील, गजानन कोठावळे, चंद्रशेखर सगरे, दीपकराव ओलेकर, दत्ताजीराव पाटील, बाळासाहेब कोठावळे, भगवान वाघमारे, जगन्नाथ कोळेकर, अजित कांडे, अय्याज मुल्ला, वर्षा वाघमारे, सुरेखा कोळेकर, संगीता परदेशी, बाळूताई झुरे, छायाताई पाटील, सविता माने, जीवनराव भोसले, एम. के. पाटील, विलासराव कोळेकर, किशोर पाटील, शीतल परदेशी, अमर पाटोळे उपस्थित होते.राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष नारायण पवार व संजय पाटील यांनी आभार मानले. संजय सुंगारे यांनी सूत्रसंचालन केले.