शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मतदान यंत्राविरोधात सर्वपक्षीय आघाडी

By admin | Updated: March 1, 2017 23:54 IST

मतपत्रिकेद्वारेच मतदान घ्या : आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

सांगली : राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत मतदान यंत्रातील घोटाळ्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे या झालेल्या निवडणुकीतील मतमोजणीची चौकशी होण्याबरोबरच, यापुढे मतदान यंत्राने मतदान प्रक्रिया पार न पाडता, पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी बुधवारी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी केली. जगातील प्रगत देशांत अजूनही मतपत्रिकेद्वारेच मतदान होत असताना, आपल्या देशातच मतदान यंत्रांचा हट्टाहास का? असा सवालही यावेळी अनेक वक्त्यांनी व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत मतदान यंत्रामुळे घोळ झाल्याच्या अनेक घटना समोर आल्याने, राज्यभर सर्वत्रच मतदान यंत्राद्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्ह्यातील सर्वपक्षीय प्रतिनिधींची बैठक शासकीय विश्रामगृहात झाली. या बैठकीस भाजप वगळता इतर सर्वच राजकीय पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. मोहनराव कदम म्हणाले की, जतमध्येही असा प्रकार घडल्याने मतदान यंत्राद्वारे मतदान घेण्यास आमचा विरोध आहे. पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकेद्वारेच मतदान घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. माजी आ. शरद पाटील म्हणाले की, अमेरिकेसारख्या प्रगत देशातही मतपत्रिकेनेच मतदान घेण्यात येते. आपल्याच देशात मतदान यंत्रांचा वापर करण्यात येतो. ही पध्दत बदलणे गरजेचे असून लोकशाही वाचविण्यासाठी व सर्वसामान्य मतदारांचे हक्क अबाधित राहण्यासाठी मतपत्रिकांचाच वापर व्हायला हवा. अ‍ॅड. अजित सूर्यवंशी म्हणाले की, मतपत्रिकेतून होणाऱ्या मतदानातही घोटाळ्याच्या तक्रारी होत होत्या. पण त्याची व्याप्ती नव्हती. आता मात्र परिस्थिती बदलत आहे. सर्वपक्षीय आघाडीच्या माध्यमातून मतदान यंत्राविरोधात आघाडी करताना न्यायालयाबरोबरच जनतेतही जागृती करणे आवश्यक आहे. पृथ्वीराज पवार यांनी लढ्याची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, नाशिकमध्ये झालेल्या प्रकारामुळे मतदान यंत्राद्वारे मतदान घेण्याच्या प्रक्रियेवर संशय वाढला आहे. याविषयी अगोदरही तक्रारी आल्या होत्या. मात्र, त्यास गांभीर्याने घेण्यात आले नव्हते. लोकशाही सुदृढ व्हावी यासाठी आता सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे. न्यायालयीन लढा उभारण्याबरोबरच जनतेतूनही उठाव होणे आवश्यक आहे. याचा पहिला टप्पा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना गुरूवारी निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी सर्वसमावेशक आघाडीची स्थापन करणार आहे. यावेळी कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापालिकेचे विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, वि. द. बर्वे, अय्याज नायकवडी, शेखर माने, मनसेचे तानाजीराव सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष संतोष पाटील, डॉ. संजय पाटील, अमर पडळकर, किरण कांबळे, सतीश साखळकर, जयदीप भोसले, शशिकांत देठे, अशरफ वांकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)