शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बालवाडी परिसरात दारूच्या बाटल्या, इंजेक्शनचा खच

By admin | Updated: March 1, 2017 00:29 IST

बालवाडी परिसरात दारूच्या बाटल्या, इंजेक्शनचा खच

सांगली : शहरातील त्रिकोणी बागेजवळील बालवाडी परिसरात दारूच्या बाटल्या, इंजेक्शनच्या सिरींज आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. स्थायी समिती सभापती संगीता हारगे व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने या बालवाडीला अचानक भेट दिली असता हा प्रकार उघडकीस आला. सभापतींनी तात्काळ पाहणी करुन या बालवाडी स्वच्छतेचे आदेश दिले आहेत. त्रिकोणी बागेजवळील ही बालवाडी मुलांच्या संस्कारासाठी कमी आणि विवाह व अन्य समारंभासाठी अधिक उरली आहे. स्वच्छतेसाठी कर्मचारी नाही, की सुरक्षारक्षक नाही. अशी अवस्था या बालवाडीची झाली आहे. या बालवाडीत ७० हून अधिक मुले असून एकच शिक्षिका आहे. बालवाडीच्या परिसरात अस्वच्छता, कचरा, दारूच्या बाटल्यांचा ढीग, इंजेक्शनच्या सिरींज पडल्याचे आढळून आले. या बालवाडीच्या खिडक्यांच्या जाळ्याही गंजून तुटून गेल्या आहेत. बालवाडीच्या मागच्या बाजूस साचलेल्या सांडपाण्यातच दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. या ठिकाणी डासांचे साम्राज्य पसरले आहे. या बालवाडीला कसलीही सुरक्षितता नाही. रात्रीच्यावेळी येथे अवैध व्यवसायही चालत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली होती.याबाबत काही नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली असता, सभापती संगीता हारगे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता खोत, नगरसेवक राजू गवळी, युवराज गायकवाड, सुरेखा कांबळे, पद्मिनी जाधव यांनी अचानक बालवाडीस भेट दिली. दारूच्या बाटल्या, इंजेक्शन सिंरीजचा खच, अस्वच्छता पाहून नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. सभापती हारगे यांनी स्वच्छता निरीक्षक याकुब मद्रासी यांना जागेवर बोलावून धारेवर धरले. स्वच्छतेची जबाबदारी कुणाची? असा सवाल त्यांनी केला. या बालवाडीतील शिक्षिकने, याबाबत तक्रार करुनही स्वच्छतेबाबत कसलीही दखल घेतली जात नसल्याचे सभापतींना सांगितले. (प्रतिनिधी)