शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेस पाण्यासाठी रोखली

By admin | Updated: April 12, 2016 00:35 IST

मिरजेत प्रवाशांचा संताप : अधीक्षकांना घेराव

मिरज : अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेस गाडीत पाणी नसल्याच्या कारणावरून सोमवारी संतप्त रेल्वे प्रवाशांनी मिरजेत एक तास एक्स्प्रेस रोखली. स्थानक अधीक्षकांना घेराव घालून जाब विचारला. त्यामुळे रेल्वे स्थानकात गोंधळ उडाला.अजमेर-म्हैसूर ही एक्स्प्रेस गाडी आज सकाळी पुण्यात पोहोचल्यानंतर प्रवाशांना वाटले की, रेल्वे गाडीमध्ये पुणे स्थानकात पाणी भरले जाईल. मात्र पाणी न भरताच एक्स्प्रेस मिरजेकडे येण्यास निघाली. गाडीत पाणी नसल्याने शौचास जाण्याचीही अडचण झाली. पाण्याअभावी रेल्वे गाडीत दुर्गंधी पसरल्याने त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेस मिरजेत सकाळी १० वाजून २० मिनिटांनी आली असता, मिरजेत पाणी भरण्याची व्यवस्था आहे. मात्र मिरजेतून लातूरला पाणी पाठविण्यासाठी रविवारी दुपारपासून सोमवारी पहाटेपर्यंत रेल्वे टँकरमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू होते. यामुळे रेल्वे स्थानकावरील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. स्थानकामध्येही पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते. यामुळे अजमेर एक्स्प्रेसमधील सर्व प्रवासी संतप्त झाले. त्यांनी स्टेशन अधीक्षकांना घेराव घालून रेल्वेत पाणी भरण्यासाठी एक्स्प्रेस गाडी मिरज स्थानकात एक तास रोखून धरली. तात्काळ रेल्वे अधिकाऱ्यांनी जलशुध्दीकरण केंद्रास संपर्क साधून रेल्वे गाडीत पाणी भरण्याची व्यवस्था केल्याने अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेस म्हैसूरकडे मार्गस्थ झाली. त्यामुळे पुढे जाणाऱ्या अनेक प्रवाशांचे हाल झाले. (वार्ताहर)