शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अजितराव घोरपडे पतंगरावांच्या भेटीला

By admin | Updated: March 14, 2016 00:16 IST

राजकीय चर्चेला उधाण : सांगलीत तासभर चर्चा; दिनकर पाटील यांचीही हजेरी

सांगली : पक्षीय नेत्यांबद्दल नाराज असलेले भाजप नेते, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी कॉँग्रेस नेते आ. पतंगराव कदम यांची रविवारी भेट घेतली. याचवेळी बाजार समितीच्या एका कामासाठी भाजपचे नेते माजी आमदार दिनकर पाटीलही उपस्थित होते. पतंगरावांच्या सांगलीतील निवासस्थानी तासभर त्यांची बैठक चालल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपासून अजितराव घोरपडे आणि भाजपचे खासदार संजय पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. भाजपमध्ये असूनही घोरपडे पक्षीय कार्यक्रमांपासून दूर राहत आहेत. त्यांची नाराजी आता मतदारसंघासह जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. यातच त्यांनी रविवारी सकाळी पतंगराव कदम यांची सांगलीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पतंगरावांशी त्यांची तासभर चर्चासुद्धा झाली. त्यानंतर भाजपचे दुसरे नेते माजी आमदार दिनकर पाटीलही त्याठिकाणी आले. दोन भाजप नेते आणि कॉँग्रेस नेत्यांमध्ये जवळपास तासभर गुफ्तगू सुरू होते. बैठकीतील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. बाजार समितीच्या एका कामासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपण पतंगरावांशी चर्चा केल्याचे दिनकर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.घोरपडे यांची भेट राजकीय गोटात चर्चेचा विषय बनली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते नाराज आहेत. त्यामुळे अनेकदा त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चाही रंगत असते. घोरपडे यांनी यापूर्वीही अनेकदा पक्ष बदलले आहेत. त्यामुळे रविवारच्या कॉँग्रेस नेत्यांच्या भेटीमुळेही जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात त्यांच्या कॉँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)४राष्ट्रवादीमधून आजी-माजी आमदार तसेच नेत्यांचा एक मोठा गट लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप, शिवसेनेत गेला होता. भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना अद्याप एकही पद मिळालेले नाही. पक्षातील त्यांच्या अस्तित्वाबद्दल कार्यकर्तेच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. त्यामुळे अशा नाराज नेत्यांकडूनही अन्य पक्षांची वाट शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.काँग्रेस नेत्यांचेही प्रयत्न सांगलीतील एका कॉँग्रेस कार्यकर्त्याने घोरपडे यांच्या कॉँग्रेस पक्षप्रवेशाच्या चर्चेला दुजोरा दिला. कॉँग्रेस नेत्यांचे तसे प्रयत्न चालू असून, घोरपडे आज ना उद्या कॉँग्रेसकडेच येणार, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसनेही जिल्ह्यातील ताकद वाढविण्याच्या दृष्टीने बेरजेचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे.