शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेची ऐशीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहरात नगरपालिकेने बसस्थानक आवारासह काही चौकात स्वच्छ सर्वेक्षणाचे फलक लावले आहेत. मात्र स्वच्छतेची ऐशीतैशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : शहरात नगरपालिकेने बसस्थानक आवारासह काही चौकात स्वच्छ सर्वेक्षणाचे फलक लावले आहेत. मात्र स्वच्छतेची ऐशीतैशी आहे. बसस्थानकात स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या फलकाखालीच कचऱ्याचा ढीग आहे. तेथे डुकरे वावरतात. अशा अस्वच्छ वातावरणात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

नगरपालिकेने स्वच्छता मोहिमेत भाग घेतला आहे. यामध्ये कचऱ्याचे विलगीकरण, प्लास्टिकमुक्त शहर, स्वछ आणि सुविधापूर्ण सार्वजनिक शौचालय, हागणदारीमुक्त शहर आदी घोषणा असल्या तरी त्या फक्त कागदावरच आहेत. ठिकठिकाणी कचरा टाकला जातो. गटारी तुंबल्या आहेत. बसस्थानक आवारात कित्येक दिवसांपासून कचऱ्याचे ढीग असून, गाजर गवत, झुडपे वाढली आहेत. यावर ‘लोकमत’ने वेळोवेळी आवाज उठवला आहे. परंतु येथील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.

बसस्थानकाच्या डाव्या बाजूस पालिकेने स्वच्छता सर्वेक्षणाचा फलक लावला आहे. या फलकावरील घोषणांना बसस्थानकातील अधिकाऱ्यांनी तिलांजली दिली आहे. बसस्थानकाच्या संरक्षण भिंतीपलीकडील दुकानदार, रुग्णालये, निवासी नागरिक बसस्थानक आवारातील स्वच्छता सर्वेक्षणाच्या फलकाखालीच कचरा टाकतात. याकडे पालिका आरोग्य अधिकारी आणि स्थानक प्रमुख दुर्लक्ष करीत घोषणेला हरताळ फासत आहेत.

सध्या इस्लामपुरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. त्याचबरोबर शहरात डुकरांचाही वावर आहे. त्यामुळे येथे नेहमीच अस्वछता असते. यापूर्वी पालिकेने डुकराचा बंदोबस्त केला होता. आता पुन्हा ती शहरात दिसू लागली आहेत. त्यामुळे स्वछ सर्वेक्षणाचा फज्जा उडाला आहे.

चौकट

खड्डे देणार आजारांना निमंत्रण

बसस्थानकात ठिकठिकाणी खड्डे आहेत. पावसाळ्यात काही ठिकाणी पाणी साचते. या परिसरात असलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. त्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनियासारख्या रोगाचा फैलाव होऊ शकतो.