शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

तब्बल सहा वर्षांनी पलूसला आमसभा

By admin | Updated: June 21, 2014 00:21 IST

आज आयोजन : प्रशासनाची धावपळ

पलूस : आमसभा घेण्याबाबत तालुक्यातील नागरिकांकडून वारंवार केल्या जाणाऱ्या मागणीला यश आले असून, शनिवार, दि. २१ रोजी सकाळी ११ वाजता येथील पंचायत समितीच्या प्रांगणात तब्बल सहा वर्षांनंतर आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे. अचानकच आमसभा घेण्याचा निर्णय घोषित केल्यामुळे तालुक्यातील प्रशासन अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. विविध विभागातील कागदपत्रांची जमवाजमव, तर काही ठिकाणी मेळ लावण्याचा प्रयत्न आज (शुक्रवार) रात्री उशिरापर्यंत सुरू होता. पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेस जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे व सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. गेल्या सहा वर्षांपासून पलूस व कडेगाव या तालुक्यात आमसभा झाली नसल्याने नागरिकांना आपल्या व्यथा कोणापुढे मांडाव्यात?, हा प्रश्न पडला होता. अधिकारी, कर्मचारी वर्गाची अरेरावी, रोहयोमधून मलिदा मिळणाऱ्या कामांना प्राधान्य देणे, सर्वाधिक कमिशन देणाऱ्यांनाच कामाचे ठेके देणे, सर्वसामान्यांना किरकोळ कामासाठी कार्यालयात हेलपाटे मारावयास लावणे आदी गैरप्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. पंचायत समितीत कॉँग्रेसची सत्ता आहे. मात्र पदाधिकाऱ्यांचा नागरिकांशी संपर्क नाही. दरम्यान, २५ जूनपर्यंत आमसभा न घेतल्यास पलूस पंचायतीसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला होता. अखेर प्रशासनाला सहा वर्षांनंतर का होईना, जाग आली आणि तडकाफडकी २१ जूनला आमसभेचा निर्णय घेण्यात आला. या आकस्मिक घोषणेमुळे पलूस तहसील व पंचायत समितीच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांची मात्र तारांबळ उडाली आहे. कागदपत्रे व रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. (वार्ताहर)