शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रांतांच्या नोटिसीनंतर रस्ते दुरूस्ती सुरू

By admin | Updated: December 16, 2014 00:03 IST

मिरज-कवठेमहांकाळ रस्ता : बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना फौजदारी कारवाईची नोटीस

मिरज : मिरज ते कवठेमहांकाळ तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल मिरजेचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मिरज व मिरज पश्चिम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना फौजदारी कारवाईची नोटीस बजावली आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या नोटिसीमुळे बांधकाम विभागाची यंत्रणा कार्यान्वित झाली असून, मिरज ते कवठेमहांकाळ रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबाबत प्रांताधिकाऱ्यांनी कठोर पवित्रा घेतला आहे. मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची पावसाळ्यात दुरवस्था झाली आहे. गेल्या वर्षभरात रस्ते दुरूस्ती झाली नसल्याने रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यामुळे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी मिरज व मिरज पश्चिम बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना रस्त्यांच्या दुर्दशेला जबाबदार धरून कारवाईची नोटीस दिली आहे. मिरज पूर्व भागातील व कवठेमहांकाळ तालुक्यातील रस्ते मोठ्याप्रमाणात खराब झाले आहेत. त्यामुळे वारंवार अपघात होऊन जीवित व वित्तहानी होत असतानाही याकडे आपल्याकडून दुर्लक्ष होते, ही अत्यंत गंभीर बाब आहे. आपल्या ताब्यात असलेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीबाबत तातडीने आवश्यक उपाययोजना केली नाही, तर अपघातांच्या दुर्घटनेस जबाबदार धरून उपविभागीय दंडाधिकारी म्हणून आपल्याविरूध्द कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नोटिसीत देण्यात आला आहे. नोटिसीमुळे बांधकाम विभागाचे अधिकारी खडबडून जागे होऊन त्यांनी रस्ते दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. मिरज ते कवठेमहांकाळ तालुक्यात काही ठिकाणी खड्डे भरण्याचे व पॅचवर्कचे काम सुरू झाले आहे. रस्ते दुरूस्तीबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनाही प्रांताधिकाऱ्यांनी यापूर्वी कारवाईची नोटीस दिल्याने मिरज ते शिरढोणदरम्यान महामार्गाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. (वार्ताहर)अधिकारी खडबडून जागेनोटिसीमुळे बांधकाम विभागाचे अधिकारी खडबडून जागे होऊन त्यांनी रस्ते दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. मिरज ते कवठेमहांकाळ तालुक्यात काही ठिकाणी खड्डे भरण्याचे व पॅचवर्कचे काम सुरू झाले आहे. रस्ते दुरूस्तीबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनाही प्रांताधिकाऱ्यांनी नोटिसा बजाविल्या आहेत.मिरज तालुक्यातील अन्य रस्त्यांच्या खड्ड्यांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.