शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दीर्घ प्रतीक्षेनंतर मिरज पूर्व भागात रस्त्यांची दुरुस्ती सुरू

By admin | Updated: January 20, 2015 00:55 IST

वाहनधारकांमधून समाधान : खराब रस्त्यांचा वनवास संपणार--लोकमतचा प्रभाव

लिंगनूर : मिरज पूर्व भागात पाच वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सर्वच रस्त्यांवर टप्प्यांच्या दुरुस्तीस सुरूवात झाली आहे. मिरज ते सलगरे मार्गावर सुरू झालेल्या रस्ता दुरुस्तीमुळे वाहनधारक व प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अनेक रस्त्यांवर पूर्ण दुरुस्ती, मोठे पॅच व खड्डे भरण्याचे कामही वेगात सुरू आहे. मिरज पूर्व भागात सर्वाधिक तक्रार मिरज ते सलगरे या आंतरराज्य मार्गाची होती. या रस्त्याची मागील पाच वर्षात दुरवस्था झाली होती. याचा फटका वाहनधारक, चालक, प्रवासी, वाहतूकदारांनी सोसला आहे. अनेक प्रकारची आंदोलने, निवेदने यांनी मागील काही वर्षे गाजली आहेत. दरम्यानच्या काळात खराब रस्त्यांना वैतागून राज्य परिवहन मंडळानेही बससेवा बंद करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. मिरज ते सलगरेदरम्यान टाकळी, मल्लेवाडी, एरंडोली, शिपूर, बेळंकी, सलगरे ही मुख्य गावे असून यापैकी प्रथम टप्प्यात एरंडोली ते शिपूरदरम्यान रस्ता दुरुस्ती सुरू झाली आहे. येथे वेगाने काम सुरू असून पॅचवर्कऐवजी पूर्ण रस्ता दुरुस्ती सुरू आहे. यापुढील टप्प्यात बेळंकी ते सलगरेसह मिरजपासून कवठेमहांकाळला जोडणाऱ्या कोंगनोळी हद्दीतील रेल्वे पुलापर्यंत रस्त्याची दुरूस्ती होणार आहे. पुढील दोन-तीन वर्षात भरीव निधीची तरतूद झाल्यास येथील रुंदीकरणही शक्य आहे.मिरज ते बेडग रस्ता रुंदीकरणाचे कामही प्रगतिपथावर आहे. त्यापुढील बेडग ते आरगदरम्यान हुल्लेगिरी फाटा, आरग विजापूर वेस, लिंगनूर ते आरग व लिंगनूर ते बेळंकी, जानराववाडी फाटा ते बेळंकी स्टॅँडपर्यंत रस्ता दुरुस्ती व पॅचवर्क होणार आहे. लिंगनूर ते खटावदरम्यानही रस्ता दुरुस्ती होणार आहे. (वार्ताहर)चर्चा ‘लोकमत’चीमिरज पूर्व भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याची सर्व स्तरातून दखल घेतली गेली आहे. सध्या सुरू झालेल्या दुरुस्तीमुळे ‘लोकमत’मधील बातम्यांची चर्चा होत असून, त्याचाच प्रभाव असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.