शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकरांचे मारेकरी ३६ महिन्यांनंतरही मोकाट

By admin | Updated: August 20, 2016 23:15 IST

सांगलीत निषेध : सह्यांची मोहीम, काळे निवेदन सादर

सांगली : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला ३६ महिने उलटूनही त्यांच्या मारेकऱ्यांना जेरबंद करण्यात शासकीय यंत्रणांना अपयश येत असल्याच्या निषेधार्थ शनिवारी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाला सादर करण्यासाठी सह्यांची मोहीमही राबविण्यात आली. मागण्यांचे काळे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. डॉ. दाभोलकर यांच्या खुनास शनिवारी तीन वर्षे पूर्ण झाली तरीही सरकारकडून त्यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात अपयश येत आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने राज्यभर निदर्शने, आंदोलन करण्यात येत आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून सांगलीत शनिवारी स्टेशन चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेची सुरुवात जयश्रीताई मदन पाटील आणि महापौर हारुण शिकलगार यांनी सही करून केली. यावेळी स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील, कांचन कांबळे, जनार्दन गोंधळे आदी उपस्थित होते. त्यानंतर दिवसभर सह्या करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी कायम होती. अंनिसच्या सर्व कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेले काळे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या होऊनही त्यांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिस यंत्रणांना अपयश आले असून, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या तिन्ही हत्यांच्या पाठीमागे असलेल्या मुख्य सूत्रधाराला अटक करावी, संशयित म्हणून अटक केलेल्यांची कसून चौकशी करावी, एनआयएने फरार घोषित केलेल्या सनातन संस्थेच्या साधकांची छायाचित्रे सार्वजनिक ठिकाणी लावावीत, राज्य सरकारने दिलेल्या अहवालानुसार सनातन संस्थेवर बंदी घालावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव, अ‍ॅड. के. डी. शिंदे, नामदेवराव करगणे, लीलाताई जाधव, डॉ. संजय निटवे, प्रा. प. रा. आर्डे, राहुल थोरात, अ‍ॅड. अमित शिंदे, अण्णा गेजगे, शशिकांत सुतार, मुनीर मुल्ला, भास्कर सदाकळे, सुहास यडोरकर, सुहास पवार, कबीर मुलाणी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मॉर्निंग वॉक...शहरासह जिल्ह्यात तासगाव, शिराळा येथे सकाळी निर्भय मॉर्निंग वॉक, इस्लामपूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सह्यांच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला.