शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीच्या २४ फेर्‍यानंतर निकाल सांगली लोकसभा : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमधून उद्या होणार उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला

By admin | Updated: May 15, 2014 01:05 IST

सांगली : लोकसभेच्या सांगली मतदार संघासाठी उद्या (शुक्रवार) मतमोजणी होत असून, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून एकूण

सांगली : लोकसभेच्या सांगली मतदार संघासाठी उद्या (शुक्रवार) मतमोजणी होत असून, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून एकूण २४ फेर्‍यांमध्ये मतमोजणी होणार असून, दुपारी दीड वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी ६६६ कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रात जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय ६ विभाग करण्यात आले आहेत व एक टपाली मतमोजणी विभाग असे एकूण सात विभाग आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय तयार करण्यात आलेल्या विभागांमध्ये प्रत्येकी १६ टेबल लावण्यात आले आहेत. एकूण ९० टेबल असून, या टेबलावरूनच मतमोजणीची प्रक्रिया होणार असून, सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होणार आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचार्‍यांना सकाळी ६ वाजता नियुक्त केलेल्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सकाळी सात वाजता ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाचे सील उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहे. पहिल्यांदा टपाली मतदान व त्यानंतर ईव्हीएमवरील मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मतमोजणीच्या एकूण २४ फेर्‍या होणार आहेत. सकाळी साडे नऊच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)