शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सभागृह नामकरणावरून प्रशासनाचे हात वर...

By admin | Updated: November 5, 2015 00:09 IST

वाळवा पंचायत समिती : वसंतदादा पाटील यांचे नाव कायम

इस्लामपूर : वाळवा पंचायत समितीच्या नव्या इमारतीमधील सभागृहाच्या नामकरणावरुन बांधकाम उपअभियंत्यासह गटविकास अधिकाऱ्यांनी हात वर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांना प्राप्त झालेल्या लेखी प्रशासकीय पत्रव्यवहारात, शासनाची परवानगी न घेता केवळ ठरावाद्वारे परस्परच नामकरण केल्याचे म्हटले आहे.पंचायत समितीच्या नव्या इमारतीमधील सभागृहाला सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेसने ‘लोकनेते राजारामबापू पाटील सभागृह’ असे नाव देण्याचा ठराव २५ जुलै २0१४ च्या सभेत केला होता. दरम्यान, ही नवीन इमारत अद्याप बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. पंचायत समितीकडे तिचे हस्तांतरण झालेले नाही. तसेच शासनाने कोणत्याही इमारतीत मान्यवरांचे नाव देण्यास मनाई करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मात्र हे परिपत्रक निदर्शनास न आल्याने नामकरणाचा ठराव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे सांगितले.दरम्यान, सभापती रवींद्र बर्डे यांनी १५ आॅक्टोबर रोजी परस्परच सभागृहाला ‘लोकनेते राजारामबापू पाटील सभागृह’ असा फलक लावला असून सभागृहातील तैलचित्रेही परस्पर लावली आहेत. त्याबाबतचा खर्च बांधकाम विभागाने केलेला नाही. तसेच बांधकाम उपअभियंत्यांनी पं. स.च्या नवीन सभागृहास पूर्वीचे ‘वसंतदादा पाटील सभागृह’ असे नाव कायम करण्याबाबतचा सविस्तर अहवालही गटविकास अधिकाऱ्यांना सादर केल्याचे महाडिक यांनी सांगितले. सभागृहाच्या नामकरणाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच हात वर केल्याने, हा विषय वाढण्याची चिन्हे आहेत. याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चेला मोठे उधाण आले आहे.दरम्यान, शुक्रवारी (६ नोव्हेंबर) होणाऱ्या लाक्षणिक उपोषणाला तालुक्यातील दादाप्रेमी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सम्राट महाडिक यांनी केले आहे. (वार्ताहर)नाव देण्यास मनाई : वाद चिघळणारशासनाने कोणत्याही इमारतीत मान्यवरांचे नाव देण्यास मनाई करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मात्र हे परिपत्रक निदर्शनास न आल्याने नामकरणाचा ठराव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे सांगितले. नामकरणाबाबत प्रशासनाने हात वर केल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.