शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

सांगलीच्या सन्मती मंचचा व्यसनमुक्ती, स्वच्छतेचा जागर--महावीर जयंती विशेष...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:14 IST

सांगली : समाजात अनेक संघटना प्रबोधन, जनजागृतीचे काम करीत असतात. सन्मती संस्कार मंच ही जैन समाजातील अशीच एक संघटना. ही संघटना व्यसनमुक्ती, शाकाहार, स्वच्छता याचबरोबर धर्मसंस्काराचेही काम करते.

ठळक मुद्दे विविध उपक्रम : धर्मसंस्काराला सामाजिक जाणिवेची जोड; व्यसनमुक्ती, पर्यावरण रक्षणासाठीही कार्यकर्त्यांनी राबविल्या मोहिमा

सांगली : समाजात अनेक संघटना प्रबोधन, जनजागृतीचे काम करीत असतात. सन्मती संस्कार मंच ही जैन समाजातील अशीच एक संघटना. ही संघटना व्यसनमुक्ती, शाकाहार, स्वच्छता याचबरोबर धर्मसंस्काराचेही काम करते. बारा वर्षांपूर्वी लावलेले हे रोपटे आज वटवृक्ष बनले असून महाराष्ट्र, कर्नाटकातील हजारो लोक या मंचाशी जोडले गेले आहेत.

वीर सेवा दलाचे संस्थापक वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या सान्निध्यात राहिलेल्या व त्यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या सुरेश चौगले यांनी २२ डिसेंबर २००५ रोजी सन्मती संस्कार मंचाची स्थापना केली. जैन समाजातील नव्या पिढीला धर्मसंस्काराचे धडे देण्याबरोबरच त्यांनी सामाजिक उपक्रमांचीही जोड दिली. संस्थापक सुरेश चौगले, अध्यक्ष विजय भोकरे यांनी सन्मती संस्कार मंचाची पताका महाराष्ट्र आणि कर्नाटकात फडकवली आहे.

वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांनी व्यसनमुक्ती व शाकाहारासाठी प्रचंड काम केले. त्यांच्या निधनानंतर ही चळवळ थोडी मागे पडली होती. चौगले यांनी तो विचार घेऊन संस्कार मंचाच्या कार्याला सुरूवात केली. कुंथलगिरी येथे पहिले धर्मसंस्कार शिबिर घेतले. तेथून सन्मती संस्कार मंचाने धर्मसंस्काराबरोबर सामाजिक उपक्रमाला वाहून घेतले.

डॉ. बाबा आमटेंचा आनंदवन, सांगलीतील एड्स सेवा केंद्र, विविध अनाथाश्रम, वृद्धाश्रम या ठिकाणी मंचाच्या कार्यकर्त्यांना नेऊन तेथे मदतीचा हात देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सांगलीच्या एड्स केंद्रात प्रत्येक दिवाळीला मंचातर्फे मुलांना साहित्याचे वाटप केले जाते. कोल्हापूरच्या नसिमा हुजरुक यांच्या अपंग सेवा केंद्रात आर्थिक मदतीबरोबरच अन्नदानासाठी मदत केली जाते. सोलापूर व पंढरपूरच्या अनाथाश्रमाला भेटी देऊन कार्यकर्त्यांचे वाढदिवस अशा आश्रमातून साजरे व्हावेत, असा संकल्प हाती घेतला आहे.

मंचाने गेल्या काही वर्षांपासून स्वच्छतेचा जागर सुरू केला आहे. नुकत्याच झालेल्या श्रवणबेळगोळ येथील महामस्तकाभिषेक सोहळ्यात दीड ते दोन हजार तरुण, वृद्ध, महिला यांनी सन्मती संस्कार मंचाच्या झेंड्याखाली स्वच्छतेची जबाबदारी यशस्वीपणे पेलली. सम्मेद शिखरजी या जैनधर्मियांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणीही मंचाच्यावतीने स्वच्छतेची मोहीम हाती घेतली जाते.

समाजातील गोरगरिबांना सम्मेद शिखरजी, श्रवणबेळगोळ येथे मोफत दर्शन घडवले जाते. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात तर मंचने मोठे काम केले आहे. निमशिरगाव येथे आचार्य शांतिसागर महाराज जयंतीनिमित्त १००८ वृक्षांची लागवड करून पर्यावरणाचा ध्यासही त्यांनी घेतला आहे.विधवांना दिला सन्मानसमाजात विधवा महिलांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. त्यांना मानसन्मान मिळत नाही. अशा शंभरहून अधिक विधवा महिलांना एकत्र करून त्यांना सन्मान मिळवून देण्याचे काम मंचाने केले आहे. संस्कार मंचाच्यावतीने कोणताही कार्यक्रम असेल, तर त्यात विधवा महिलांना सहभागी करून घेतले जाते. त्यांच्याहस्ते ध्वजारोहण, दीपप्रज्ज्वलन करून त्यांचा सन्मान वाढविण्याचे काम केले जात आहे. 

तीन बंधारे उभारणारमंचतर्फे दरवर्षी कुंथलगिरी येथे धर्मसंस्कार शिबिर होत असते. तसा कुंथलगिरीचा परिसर हा दुष्काळीच. गतवर्षी येथे एक बंधारा बांधला. त्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्याची व्यवस्थाही झाली. यंदा आणखी तीन नवीन बंधारे बांधण्याचा संकल्प सुरेश चौगले व त्यांच्या मंचाने सोडला आहे.