शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यांअभावी अडले पीक विमा अर्जाचे घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:57 IST

सांगली : पीक विम्याचे अर्ज दाखल करून घेण्यासाठी रविवारी सुटीदिवशी बॅँका सुरू असताना तलाठीच नसल्याने उताºयांअभावी पीक विम्याचे घोडे अडले. त्यामुळे अनेक शेतकºयांना इच्छा असूनही अर्ज दाखल करता आले नाहीत. सोमवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपुष्टात आली. आकडेवारीची जुळवाजुळव सुरू असली तरी, सुमारे ६० हजारांवर शेतकºयांनी अर्ज दाखल केले आहेत.प्रधानमंत्री ...

ठळक मुद्देजिल्हा बॅँक : सुटीदिवशीचा घोळ; ६0 हजारांवर अर्ज दाखलरविवारी बॅँकांबरोबर तलाठ्यांचीही उपस्थिती असती तर कदाचित अर्जदारांचा आकडा वाढला असतासंगणकीय नोंदीसाठी बँकेला कसरत करावी लागली.

सांगली : पीक विम्याचे अर्ज दाखल करून घेण्यासाठी रविवारी सुटीदिवशी बॅँका सुरू असताना तलाठीच नसल्याने उताºयांअभावी पीक विम्याचे घोडे अडले. त्यामुळे अनेक शेतकºयांना इच्छा असूनही अर्ज दाखल करता आले नाहीत. सोमवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपुष्टात आली. आकडेवारीची जुळवाजुळव सुरू असली तरी, सुमारे ६० हजारांवर शेतकºयांनी अर्ज दाखल केले आहेत.प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी व जिल्हा बॅँकांची धावाधाव सुरू आहे. सोमवारी मुदत संपणार असल्यामुळे रिझर्व्ह बॅँक व नाबार्डने सुटीदिवशी बॅँकांचे कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. हे आदेश देताना त्यांनी या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असणाºया तलाठ्यांच्या हजेरीबाबत महसूल विभागाला कोणत्याच सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे रविवारी बॅँका सुरू असताना तलाठीच नसल्याने त्यांच्या आवश्यक असलेल्या दाखल्यांअभावी विम्याचे अर्ज अनेक शेतकºयांना दाखल करता आले नाहीत. रविवारी सांगलीतील बॅँकेच्या मुख्यालयासह ग्रामीण भागातील सर्व १९८ शाखा सुरू होत्या. रात्री उशिरापर्यंत संगणकीय नोंदीचे काम सुरू होते. रविवारी सुटीदिवशी एका दिवसात केवळ १२ हजार १८७ शेतकºयांनाच अर्ज करता आले. त्यांनी एकूण ५६ लाख ५३ हजार रुपये विमा हप्त्यापोटी बॅँकेत जमा केले. तलाठी हजर असल्याने सोमवारी एका दिवसात सुमारे २५ हजार अर्ज दाखल झाले आहेत. रविवारीही अशीच परिस्थिती असती तर कदाचित अर्जांचा आकडा वाढला असता.

गतवर्षी १ लाख ८० हजार शेतकºयांनी पीक विम्यासाठी अर्ज दाखल केले होते. यावर्षी तुलनेने अत्यंत कमी अर्ज दाखल झाले आहेत. याची कारणमीमांसा सुरू असली तरी, मुदतवाढीचीही मागणी जोर धरत आहे. पीक विम्यासाठी केंद्र सरकाने यंदा आॅनलाईन प्रणाली सुरू केली आहे. यात अनेक त्रुटी असल्याने शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागला. बॅँक कर्मचाºयांनाही याचा त्रास झाला.

पीक विम्यासाठी केवळ पाच कागदपत्रांची गरज आहे. यात शेतकºयांचा विहीत नमुन्यातील अर्ज त्याच्यासोबत पीक पेरणी उतारा, ८ अ चा उतारा, बॅँक पासबुक व आधार कार्डची छायांकित प्रत या पाच कागदपत्रांचा समावेश आहे. उतारे तलाठ्यांकडून मिळत असल्याने रविवारी बॅँकांबरोबर तलाठ्यांचीही उपस्थिती असती तर कदाचित अर्जदारांचा आकडा वाढला असता; मात्र शासनाच्या नियोजनातील गोंधळ यानिमित्ताने समोर आला आहे.आकडा पन्नास हजारांवर जाणारपीक विम्याच्या अर्जदारांचा आकडा सोमवारी सकाळपर्यंत ३६ हजारांवर गेला होता. त्यांनी हप्त्यापोटी १ कोटी ६७ लाख रुपये बँकेत भरले आहेत.सोमवारीही दिवसभर अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू होती. अनेक अर्ज आॅफलाईन स्वीकारले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या संगणकीय नोंदीसाठी बँकेला कसरत करावी लागली. सोमवारचा आकडा गृहीत धरल्