शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेते आमिर खान शिराळा तालुक्यातील करमाळेस भेट देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:50 IST

शिराळा : शिराळा तालुक्यातील करमाळे या गावास ‘पाणी फाउंडेशन’चे संस्थापक, अभिनेते आमिर खान भेट देणार आहेत. स्वतः ...

शिराळा : शिराळा तालुक्यातील करमाळे या गावास ‘पाणी फाउंडेशन’चे संस्थापक, अभिनेते आमिर खान भेट देणार आहेत. स्वतः आमिर खान यांनी याबाबतची माहिती समाज माध्यमातून एका ध्वनी चित्रफितीद्वारे दिली आहे. यामुळे करमाळेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे मूळचे करमाळे येथील राकेश माने यांनी आमिर खान यांच्या घरी जाऊन त्यांना करमाळे येथे येण्याची विनंती केली होती.

करमाळे हे गाव शिराळा तालुक्यातील उत्तर भागात आहे. भरपूर पाऊस पडत असूनही अनेक वर्षांपासून येथे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. बहुसंख्य लोक मुंबईत कामानिमित्त स्थलांतरित झाले आहेत.

वाकुर्डे बुद्रुक योजनेची वाट बघत एक पिढी वृद्धत्वाकडे झुकली. गावातील तरुणांनी गाव पाणीदार होण्यासाठी लोकसहभागातून, श्रमदानाने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. जलनायक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीळगंगा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न सुरू आहेत. तीळगंगा नदीचा उगम करमाळ्याच्या महादेव डोंगररांगेत होतो. पुढे सुरूल-ओझर्डे-पेठमार्गे ही नदी बहे (ता. वाळवा) येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते.

महाराष्ट्र शासनाच्या यशदा संस्थेनेही दोन वर्षांपूर्वी याबद्दल पाहणी केली होती. जलसंपदामंत्री जयंतराव पाटील आणि आ. मानसिंगराव नाईक यांनीदेखील करमाळे येथे येऊन वाकुर्डे बु. योजनेचे पाणी देण्याच्या दृष्टीने चर्चा केली; पण गाव उंचावर असल्यामुळे वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी करमाळ्याच्या तलावात सोडण्यात अडचणीचे ठरत असल्याचे अधिकारी सांगतात.

आता स्वत: आमिर खान यांनी करमाळे गावाला भेट देणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे पुन्हा एकदा तीळगंगा नदीच्या पुनरुज्जीवन चळवळीला ऊर्जितावस्था आली आहे.

मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे करमाळेचे राकेश माने यांनी आमिर खान यांची भेट घेऊन त्यांना करमाळेस भेट देण्याची विनंती केली होती. यानुसार आमिर खान करमाळे येथे येणार आहेत. चित्रीकरणाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे नेमकी वेळ समजू शकलेली नाही; पण तुमच्या गावाला मी नक्की भेट देणार आहे, असे आमिर खान यांनी एका ध्वनी चित्रफितीद्वारे सांगितले आहे.

गावात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू झाल्यास तीळगंगा नदीचे पुनरुज्जीवन होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आमिर खान यांच्या येण्याने गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

फोटो : १२ शिराळा ३

ओळ : मुंबईत मनोज माने, राकेश माने व राकेश यांच्या पत्नीने अभिनेते आमिर खान यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.