फोटो : कोरेगाव (ता. वाळवा) येथील हनुमान खरेदी-विक्री संस्था नवीन इमारतीच्या उद्घाटनावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या वेळी बी. के. पाटील, विनायक पाटील, डॉ. एम. एस. पवार, संजय पाटील उपस्थित होते.
गोटखिंडी : कोरेगावमध्ये बी. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान उद्योग समूहात नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. सहकार तत्त्वावरील हे उपक्रम आदर्शवत आहेत असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोरेगाव येथे केले.
कोरेगाव (ता. वाळवा) येथील हनुमान विकास सेवा सोसायटीच्या केळी रॅपनिंग सेंटरचे व हनुमान खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या नवीन गोदामाचे उद्घाटन, तसेच शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये स्थलांतर व इफको नॅनो युरियाचा विक्री केंद्राचा प्रारंभ जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
संस्थापक बी. के. पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील, इफकोचे विभागीय व्यवस्थापक डॉ. एम. एस. पवार, संजय पाटील प्रमुख उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी व ते सर्वसामान्य जनतेला फायद्याचे ठरण्यासाठी दळवळण साधणे महत्वाची आहेत. त्या दृष्टीने येथील वारणा नदीवर कोरेगाव ते भादोले असा पूल व कृष्णा नदीवर शिरगाव ते वाळवा पुलाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. तो झाल्यास शिरगांव, वाळवा, पडवळवाडी, अहिरवाडी, गोटखिंडी, भडकंबे, कोरेगांव या गावातील कोल्हापूर जिल्हयात जाणे-येणे सोयीचे होईल.
बी. के. पाटील यांनी प्रास्ताविक केले. राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी मर्गदर्शन केले.
या वेळी संग्राम पाटील, महादेव पाटील, विनायक ताटे, विजयकुमार पुदाले, विलासराव देसावळे, भडकंबेचे सरपंच सुधीर पाटील, संग्रामसिंह घोरपडे, विश्वासराव पाटील, मोहनराव मगदूम, उदय पाटील आदी उपस्थित होते.