शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

विट्यात वाय-फायसाठी कार्यवाही सुरू

By admin | Updated: September 22, 2015 00:09 IST

वैभव पाटील : एलईडी विद्युतीकरणाचे उद्घाटन; आॅनलाईन तक्रारीचे आवाहन

विटा : विटा नगरपरिषद शहरात फोर जी वाय-फाय सुविधा देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी योग्य ती कार्यवाही सुरू केली असून, विटेकर नागरिकांनी पालिकेबाबतच्या सर्व तक्रारी आॅनलाईन नोंदवाव्यात. त्यांची तातडीने दखल घेतली जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी दिली.नगरपरिषदेच्यावतीने शहरातील कऱ्हाड रोडवरील एलईडी विद्युतीकरणाचे उद्घाटन नगराध्यक्ष पाटील यांच्याहस्ते व माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्याप्रसंगी नगराध्यक्ष पाटील बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य डॉ. नामदेव माळी, महावितरणचे सहायक अभियंता एस. आर. सदामते, श्री. सदानंद, नगरसेवक अ‍ॅड. सचिन जाधव, दहावीर शितोळे, प्रतिभा चोथे, मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते.सदाशिवराव पाटील म्हणाले, विटा शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. नागरिकांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जे जे राज्यात आहे, ते ते आपल्या विटा शहरात असले पाहिजे, अशी भूमिका घेऊन काम करीत आलो आहे आणि यापुढेही असेच काम केले जाईल.नगरपालिका मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास प्रशांत कांबळे, जगन्नाथ पाटील, अविनाश चोथे, सचिन शितोळे, पांडुरंग शितोळे, सयाजीराव शितोळे, भानुदास शितोळे, सुजित पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. नगरसेवक दहावीर शितोळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)