शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज नाकारणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:39 IST

सांगली : खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने शेतकºयांना पीककर्ज मिळाले पाहिजे, जिल्हा बँकेने सर्वाधिक ६५ टक्के कर्जपुरवठा केला असून, ही समाधानाची बाब आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांकडून अवघे २० ते २५ टक्के पीककर्ज वाटप झाले. शेतकºयांना पीककर्ज नाकारणाºया राष्ट्रीयीकृत बँकांवर कारवाईबाबत सूचना जिल्हाधिकाºयांना देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ...

सांगली : खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने शेतकºयांना पीककर्ज मिळाले पाहिजे, जिल्हा बँकेने सर्वाधिक ६५ टक्के कर्जपुरवठा केला असून, ही समाधानाची बाब आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांकडून अवघे २० ते २५ टक्के पीककर्ज वाटप झाले. शेतकºयांना पीककर्ज नाकारणाºया राष्ट्रीयीकृत बँकांवर कारवाईबाबत सूचना जिल्हाधिकाºयांना देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. त्या बँकांची विभागीय स्तरावर बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.बुधवारी जिल्हा परिषदेच्या विविध कामांचा आढावा म्हैसेकर यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे उपस्थित होते.डॉ. म्हैसेकर म्हणाले की, पाऊस विलंबाने सुरू झाल्याने पेरण्या लांबल्या होत्या. जिल्ह्यात ६३१ खरीप गावे आहेत. त्या तुलनेत आतापर्यंत पेरण्यांचे प्रमाण कमी आहे. खरीप हंगामासाठी शेतकºयांना पीककर्ज हवे आहे. पीककर्जाबाबतच्या सूचना जिल्हा मध्यवर्तीसह राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात आल्या होत्या. जिल्ह्याला एक हजार १७० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत अवघे ३५० कोटींचे कर्जवाटप झाले. राष्ट्रीयीकृत बँकांनी पीककर्ज वाटपाचे अद्याप केवळ २० ते २५ टक्केच उद्दिष्ट गाठले असल्याचे स्पष्ट झाले. या बँका शेतकºयांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. बँकेकडे कर्ज मागणाºया शेतकºयांना कर्ज मिळाले पाहिजे. तांत्रिक अडचण नसेल तर, कर्ज नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज देण्याचे प्रमाण वाढविण्याबाबत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांंनी वेळोवेळी माहिती सादर केली पाहिजे. पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाºया बँकांवर कारवाईबाबतचा कानमंत्र जिल्हाधिकाºयांना देण्यात आला आहे. तसेच विभागीय स्तरावर स्वतंत्र बैठक घेतली जाणार आहे.सात-बारा उताºयासाठी अडवणूक नकोखरीप हंगाम सुरू आहे, मात्र अनेक गावात सात-बारा मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. सात-बारा आॅनलाईनचे काम सुरू आहे, त्यामुळे तांत्रिक अडचणी आहेत. मात्र पूर्वीप्रमाणे शेतकºयांना तात्काळ सात-बारा देण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या. सात-बारासाठी अडवणूक होत असल्यास थेट तहसीलदार अथवा जिल्हाधिकाºयांकडे शेतकºयांनी तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले. त्यानंतर लगेच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.जिल्ह्यात तलाठ्यांचे ५७ नवीन सजेजिल्ह्यातील शेतकºयांची गैरसोय दूर करण्यासाठी तलाठ्यांचे ५७ नवीन सजे तयार केले असून, त्यास शासनाने मंजुरीही दिली आहे. यातून संख आणि आष्टा येथील अप्पर तहसील कार्यालयांसाठीही कर्मचाºयांची पदे मंजूर करून देण्यात येणार आहेत. यामुळे या परिसरातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांची सोय होणार आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार वाळू उपसा सुरू करूवाळू उपसा बंद असल्याने लोकांची गैरसोय होत आहे, परंतु अवैध मार्गाने वाळूचा पुरवठा सुरू आहे. उपसा बंद राहिल्याने महसुलावर परिणाम होत आहे. सांगली जिल्ह्यात १३१ वाळू उपशाची ठिकाणे निश्चित झाली आहेत. हरित न्यायालयाच्या निकषानुसार वाळू उपसा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.