शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची धोकादायक बांधकामांवर कारवाई फसली

By admin | Updated: January 6, 2015 23:59 IST

न्यायालयाचा दणका : परीक्षणासाठी समितीची नियुक्ती

मिरज : महापालिकेने धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण करून इमारती पाडण्याची कारवाई सुरू केली. मात्र जुन्या इमारतीचे तज्ज्ञ अभियंत्याकडून परीक्षण केले नसल्याने न्यायालयाने महापालिकेचा दावा फेटाळून लावला आहे. न्यायालयाच्या फटक्यामुळे रचनात्मक परीक्षणासाठी अभियंत्यांच्या समितीच्या नियुक्तीसाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. मुंब्रा येथील इमारत दुर्घटनेनंतर नगरविकास विभागाने बेकायदा व धोकादायक इमारतींवर कारवाईसाठी प्रत्येक महापालिकेला स्वतंत्र पथकाच्या निर्मितीचे आदेश दिले. त्यानुसार गतवर्षी १ जूनपासून उपायुक्तांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. या पथकाने सांगली-मिरजेतील ३० जुन्या इमारती पाडल्या. आणखी ४० धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा दिल्या. मात्र नगररचना कायद्याप्रमाणे जुन्या इमारतींचे बांधकाम धोकादायक ठरविण्यासाठी जुन्या बांधकामाचे तज्ज्ञ अभियंत्याकडून रचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल आॅडिट) आवश्यक आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाशिवाय तज्ज्ञ अभियंत्यांच्या समितीकडून जुन्या बांधकामाचे रचनात्मक परीक्षण करणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाने गतवर्षी सर्वेक्षण करून जुन्या बांधकामांना पाडण्याची नोटीस बजावली. काही इमारती पाडूनही टाकल्या; मात्र काही जुन्या इमारतीच्या मालकांनी महापालिकेच्या कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. तर काही जुन्या इमारतीतील भाडेकरुंनी न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयात सुनावणीप्रसंगी महापालिकेने रचनात्मक परीक्षण न करताच इमारती पाडण्याच्या नोटीस बजावल्याचे निदर्शनास आल्याने न्यायालयाने काही प्रकरणात महापालिकेचा धोकादायक इमारतीचा दावा फेटाळून लावला. घाईघाईने केलेल्या कारवाईने महापालिकेचे पितळ उघडे पडल्यानंतर आता रचनात्मक परीक्षणासाठी तज्ज्ञ अभियंत्यांची समिती नियुक्तीच्या हालचाली सुरू आहेत. समितीची नियुक्ती करून जुन्या बांधकामाचे परीक्षण करण्यात येणार असल्याचे उपायुक्त प्रशांत रसाळ यांनी सांगितले. (वार्ताहर)