सांगली : शहरातील प्रेमनगर परिसरात बंद असलेल्या पानपट्टीजवळ जुगार घेणार्यावर पोलिसांनी कारवाई केली. विठ्ठल मधुकर कलकुटगी (वय ३३, रा. वडर कॉलनी) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून रोख ७२० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. कलकुटगी याच्यावर विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------
सांगलीत गांजा ओढणाऱ्यांवर कारवाई
सांगली : शहरातील इंदिरा नगर झोपडपट्टीत गांजा बाळगून ओढल्याप्रकरणी दोन युवकांवर पोलिसांनी कारवाई केली. समीर सादिक ढोले (वय १८) आणि रोहन सुंदर लोंढे (वय १८) हे दोघे बुधवारी सायंकाळी गांजा ओढत असताना पाेलिसांना आढळल्याने दोघांवर कारवाई करण्यात आली. तसेच शाळा क्रमांक २२च्या मागे सिकंदर मारुती धनके (वय ३०, रा. नवीन वसाहत ) याच्याकडे गांजा आढळला. विश्रामबाग पाेलिसांनी ही कारवाई केली.
-------
दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला अटक
सांगली : शहरातील शंभरफुटी रोडनजीक श्वास हॉस्पिटलसमोरुन दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. शाहरूख उर्फ रफिक शेख (वय २३, रा. भारत सूतगिरणी परिसर, सांगली) असे संशयिताचे नाव आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून संशयित पार्किंगजवळ लपून बसला होता. नागरिकांनी याची माहिती दिल्यानंतर त्याला शहर पोलिसांनी अटक केली.