शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतील ‘ॲपेक्स केअर’च्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:19 IST

मिरज : मिरजेतील ॲपेक्स केअर हॉस्पिटलचे डॉ. महेश जाधव याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा गांधी चौक पोलिसांनी दाखल केला आहे. ...

मिरज : मिरजेतील ॲपेक्स केअर हॉस्पिटलचे डॉ. महेश जाधव याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा गांधी चौक पोलिसांनी दाखल केला आहे. याप्रकरणी डाॅक्टरच्या अटकपूर्व जामिनावर आज, शुक्रवारी सत्र न्यायालयात निर्णय होणार आहे. कोविड साथीदरम्यान जिल्ह्यात प्रथमच डाॅक्टरांवर गंभीर गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

रुग्णालयात पुरेशी यंत्रसामग्री नसताना आणि रुग्णांवर उपचार करण्यास बंदी असतानाही उपचार करून भरमसाट बिले आकारल्याप्रकरणी अ‍ॅपेक्स केअर रुग्णालयाचा संचालक डॉ. महेश जाधव याच्यासह सातजणांवर गुन्हा दाखल आहे. यापैकी पाचजणांना अटक केली आहे. अ‍ॅपेक्स रुग्णालयात उपचार घेणाऱ्या २०५ रुग्णांपैकी ८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी उपचारात हलगर्जीपणा करत अनेक रुग्णांच्या मृतास कारणीभूत असल्याचा ठपका ठेवून त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गांधी चौक पोलिसांनी भरत वेल्लाळ (रा. सांगली), गोकुळ विनायक राठोड (वय २३, रा. सांगली), बाळू ऊर्फ जानकीराम मारुती सावंत (रा. गारपीर चौक, सांगली) व राजेंद्र म्हाळाप्पा ढगे (३४, रा. कलानगर, सांगली) यांना अटक केली. डॉ. महेश जाधव यास न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन दिला आहे. प्रसन्न करंजकर व नरेंद्र जाधव या दोन आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केले आहे.

रुग्णालयात व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसतानाही डॉ. जाधव याने अ‍ॅपेक्स कोविड रुग्णालय सुरू केले होते. रुग्णांवर औषध उपचार करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय पथक न ठेवता होमिओपॅथीच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून रुग्णांवर उपचार केले होते. रुग्णांच्या नातेवाइकांकडून भरमसाट बिलांची आकारणी करून त्यांना बिलांच्या पावत्या देण्यास टाळाटाळ केली होती. याबाबत महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्याने या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचारास प्रतिबंध केले होते. बंदी असतानाही नवीन रुग्ण दाखल करून घेऊन उपचार सुरू ठेवल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. डाॅ. जाधव याच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी सत्र न्यायालयात निर्णय होणार आहे.