शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम मते जयंतरावांच्याच पाठीशी

By admin | Updated: November 16, 2015 00:11 IST

एमआयएमला टोला : राष्ट्रवादीचे इस्लामपुरातील मुस्लिम नेते सरसावले

अशोक पाटील ---इस्लामपूर--गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ इस्लामपूर शहरावर माजी मंत्री, आमदार जयंत पाटील (राष्ट्रवादीचे) यांचे वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी आपण या मतदारसंघात तळ ठोकू, असा इशारा एमआयएमच्या दोन आमदारांनी दिला आहे. यावर शहरातील राष्ट्रवादीच्या मुस्लिम नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना एमआयएम पक्षाची खिल्ली उडविली. कोणत्याही परिस्थितीत जयंत पाटील यांच्या मुस्लिम वोट बँकेला कोणीही धक्का लावू शकणार नसल्याचा प्रतिटोला त्यांनी दिला.माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, नगरसेवक पीरअल्ली पुणेकर आणि शहराच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रोझा किणीकर म्हणाल्या, इस्लामपूर शहर हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. सर्व हिंदू बांधवांचा दिवाळी सण संपल्यानंतर संभूआप्पा बुवाफन या दोन समाजातील गुरु-शिष्याच्या नावाने मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. इस्लामपूर शहरात कधीच जातीय दंगली झाल्या नाहीत. परंतु आता जातीच्या नावाखाली मते मागणाऱ्या नेत्यांची संख्या वाढू लागली आहे. याचाच फायदा काही मुस्लिम नेत्यांनी उठविला आहे.शहरातील काही मुस्लिम नेते जातीच्या नावाखाली एमआयएमच्या रूपाने राष्ट्रवादी म्हणजेच जयंत पाटील यांच्याविरोधात बीज पेरत आहेत. परंतु जयंत पाटील यांची असलेली मुस्लिम वोट बँक आजही आणि येथून पुढेही सुरक्षितच राहणार असल्याचे शहरातील बहुतांशी राष्ट्रवादीच्या मुस्लिम नेत्यांनी स्पष्ट केले आहे.इस्लामपूर नगरपरिषदेचा राजकीय इतिहास तपासला असता, नगराध्यक्षपदी युसूफ मोमीन (सावकार), मुनीर पटवेकर यांना संधी देण्यात आली आहे. तसेच उपनगराध्यक्षपदी हामजाशेठ दिवाण यांना संधी दिली होती. तसेच बहुतांशी मुस्लिम नेत्यांना नगरसेवक पदाची संधी देण्यात राष्ट्रवादीचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे मुस्लिम मतांच्या ताकदीवर हवा केलेल्या एमआयएम पक्षाला कितपत यश मिळणार, हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.जयंत पाटील हे आमचे नेते आणि आदर्श आहेत. त्यांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही. मुस्लिम समाजातील नेते त्यांचे खंदे समर्थक आहेत. जयंत पाटील समर्थकांना पदाचे आमिष दाखवले तरी, जातीयवादी संघटनेला ते बळी पडणार नाहीत. जयंत पाटील म्हणजेच राष्ट्रवादीची मुस्लिम वोट बँक सुरिक्षत राहील, याची मी खात्री देते.- रोझा किणीकर, शहराध्यक्ष, महिला राष्ट्रवादी काँग्रेस.मुस्लिम नेत्यांमध्ये कार्यालयावरुन नाराजी मिरज, सांगली वगळता इस्लामपूरसारख्या निमशहरी भागात एमआयएमचे जिल्हा कार्यालय सुरु केल्यामुळे मिरज शहरातील काही मुस्लिम नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. जिल्हाध्यक्षांनी या पदाचा सहा महिने कारभार सांभाळून दाखवावा, अशी चर्चा शनिवारी झालेल्या सभेवेळी सुरु होती.