शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मेणीजवळच्या दोन युवकांचा मुंबईत अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : कामावरून घरी परतत असताना अंगावरून दहाचाकी ट्रक गेल्याने शिराळा तालुक्यातील सावंतवाडी आणि आटुगडेवाडी (मेणी) ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोकरुड : कामावरून घरी परतत असताना अंगावरून दहाचाकी ट्रक गेल्याने शिराळा तालुक्यातील सावंतवाडी आणि आटुगडेवाडी (मेणी) येथील दोन माथाडी युवकांचे जागीच निधन झाले. ही घटना नाशिक रोडवरील वरई टोलनाक्यावर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिराळा तालुक्यातील सावंतवाडी येथील विक्रम राजाराम दीपक (वय ३२) व आटुगडेवाडी (मेणी) येथील रवींद्र ऊर्फ पप्पू सर्जेराव आटुगडे (२६, दोघेही सध्या रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) मुंबई येथील ट्रान्सपोर्टमध्ये माथाडी कामगार म्हणून काम करत होते. सध्या त्यांची कामगार म्हणून नियुक्ती वसई (जि. ठाणे) येथे असल्याने ते मोटारसायकलवरून दररोज ये-जा करत होते. रोजच्या प्रमाणे ते कामावरून घरी कोपरखैरणे येथे येत असताना वरई टोलनाक्याजवळ पावसाने वाहून रस्त्यात आलेल्या चिखलात गाडी घसरली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या दहाचाकी ट्रकने त्यांना जागीच चिरडल्याने मोठा रक्तस्राव होऊन जागीच निधन झाले.

विक्रम याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, चार वर्षांचा मुलगा, दहा महिन्याची मुलगी, भाऊ असा परिवार आहे. रवींद्र आटुगडे याचे गेल्याच वर्षी लग्न झाले असून त्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. दोघांचेही आईवडील गावी असतात. दोघांच्या अपघाती निधनाने सावंतवाडी आणि आटुगडेवाडी या गावांवर शोककळा पसरली आहे.