शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

विट्याजवळ अपघात, एक ठार

By admin | Updated: May 25, 2014 00:47 IST

दोघे जखमी, पुतण्या बचावला

 विटा : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक ठार, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास विटा-कºहाड रस्त्यावरील शिवतेज ढाब्यासमोर घडली. गोरख सीताराम जगताप (६५, रा. वडियेरायबाग, भगतमळा, ता. कडेगाव) असे अपघातात ठार झालेल्या वृध्दाचे नाव आहे. या अपघातात कृष्णत पोपट कदम (३५, रा. वडियेरायबाग) व सुनील प्रकाश बुधावले (२०, रा. सावळज, ता. तासगाव, सध्या रा. विटा) गंभीर जखमी झाले. वडियेरायबाग (भगतमळा) येथील गोरख जगताप व कृष्णत कदम शुक्रवारी कामानिमित्त विट्याला आले होते. काम संपवून रात्री पावणेनऊच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून (क्र. एमएच १०बीटी ३१५८) भगतमळा येथे घरी चालले होते. त्यावेळी पोल्ट्री कामगार असलेले सुनील बुधावले व त्यांचा नऊ वर्षाचा पुतण्या अभिजित मारुती बुधवाले हे दोघेजण दुचाकीवरून (क्र. एमएच १०एके ६५२९) विट्याकडे निघाले होते. शिवतेज ढाब्याजवळ या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. त्यात गोरख जगताप, कृष्णत कदम व सुनील बुधावले गंभीर जखमी झाले. विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सांगलीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. जगताप यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. बुधावले व कदम यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत गोरख जगताप शेतकरी असून, त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, सून, भाऊ असा परिवार आहे. (वार्ताहर)