शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आफ्रिकेत उद्योजकांना मुबलक सोयी

By admin | Updated: September 20, 2016 23:08 IST

विजयकुमार एस. : कृष्णा व्हॅली चेंबरमध्ये चर्चासत्र

कुपवाड : महाराष्ट्रातील कृषी व कृषी उत्पादनावर आधारित उद्योगांसह इतर उद्योगांसाठी आफ्रिकन देशात मुबलक सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत. उद्योजकांसाठी या देशाने अक्षरश: रेड कारपेट अंथरले आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी २६ ते २८ सप्टेंबर रोजी आफ्रिकन देशातील राजदूत, उद्योजकांची बैठक आयोजित केली आहे. या ठिकाणी प्रदर्शन आणि चर्चासत्रही आयोजित केले आहे, असे प्रतिपादन सूक्ष्म, लघू तथा मध्यम उद्योग मंत्रालय विभागाचे संचालक विजयकुमार एस. यांनी केले.कुपवाड एमआयडीसीतील कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड कॉमर्सच्या सभागृहात आयोजित उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, उपाध्यक्ष पांडुरंग रूपनर, रमेश आरवाडे, चंद्रकांत पाटील, शिवाजीराव पाटील, संचालक हरिभाऊ गुरव, अनंतकीर्ती चिमड, रतिलाल पटेल उपस्थित होते. यावेळी विजयकुमार म्हणाले की, आफिकन खंडातील इजिप्त, सुदान, दक्षिण आफ्रिका, अल्जेरिया आदींसह ५४ देशात उद्योग उभारणीसाठी मंत्रालयाच्या माध्यमातून आवाहन केले आहे. पांडुरंग रूपनर यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले. यावेळी उद्योजक प्रकाश शहा, निखिल पाटील, सदाशिव साखरे, आर. डी. जाधव, मनोज झंवर, नितीन बस्तवडे, व्ही. व्ही. भिडे, अर्चना पवार, आबा पाटील, सुधीर पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)