शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाला दोन हजार पाणीपट्टी

By admin | Updated: July 15, 2014 00:59 IST

महापालिकेच्या अंदाजपत्रकात शिफारस : ५४२ कोटींचे जम्बो बजेट

सांगली : राज्य शासनाने एलबीटी लागू केल्यापासून महापालिकेच्या तिजोरीवरील ताण वाढला असताना, स्थायी समितीचे सभापती राजेश नाईक यांनी तब्बल ५४२.१४ कोटी जमेचे व ५३ लाख शिलकीचे अंदाजपत्रक आज, सोमवारी महासभेकडे सादर केले. अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ सुचविलेली नाही. वार्षिक एकरकमी दोन हजार पाणीपट्टी, मीटरलेस पाणीपुरवठा, पुतळे, चौक सुशोभीकरण, गॅस दाहिनी, सायकल घंटागाडी, भाजी मंडईचा विकास अशा घोषणांचा पाऊसही अंदाजपत्रकात पाडला आहे. प्रशासनाच्या अंदाजपत्रकाच्या तुलनेत स्थायी समितीने ६९ कोटींची भर घातली आहे. एलबीटीच्या उत्पन्नातही ३६ कोटींची वाढ अपेक्षित धरली आहे. या अंदाजपत्रकाच्या अभ्यासासाठी सदस्यांना आठ दिवसांची मुदत देत सभा तहकूब करण्यात आली. आता पुढील सोमवारी(दि. २१) अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे विलंब झालेल्या पालिकेचे अंदाजपत्रक आज सभापती नाईक यांनी महापौर कांचन कांबळे यांच्याकडे महासभेत सादर केले. आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सत्ताधारी काँग्रेसकडून विकासकामांच्या घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत होती. अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ न करता नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करताना दुसरीकडे मोठ्या योजनेपेक्षा छोट्या-छोट्या कामांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तिजोरीत खडखडाट असताना उत्पन्न वाढीसाठी ठोस उपाययोजना आखण्यात आलेल्या नाहीत. आयुक्तांनी ४७३.०७ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यात ६९ कोटींची भर घालून ५४२.१४ कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. जमेच्या बाजूला ४४.११ कोटी वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. यात एलबीटीतून ३६.२८ कोटी, पाणीपट्टीतून सहा कोटी यासह जाहिरात कर, खोकी हस्तांतरण, पे अँड पार्क, अतिक्रमण, दूरध्वनी चर खुदाई, गुंठेवारी अनुदान आदींचा समावेश आहे. पुणे महापालिकेच्या धर्तीवर घरगुती मालमत्ताधारकांकडून प्रतिवर्षी एकरकमी पाणीपट्टी वसुलीची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार एकरकमी दोन हजार रुपये पाणीपट्टीची आकारणी केली जाईल. त्याची वसुली कर निर्धारक व संकलक विभागाकडून घरपट्टीसोबतच करण्याचा मनोदय सभापती नाईक यांनी व्यक्त केला आहे. ‘मीटरलेस पाणीपुरवठा’ हा नवा संकल्पही मांडण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागाकडील मीटर रीडिंगनुसार बिले तयार करणे, त्याचे वाटप व वसुली ही प्रक्रिया बंद होऊन त्यावर होणाऱ्या खर्चात कपात होईल, असेही नाईक यांनी सांगितले. महासभेत विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी सर्वच सदस्यांना अंदाजपत्रकाचा अभ्यास करून सूचना मांडण्यासाठी चार दिवसांचा अवधी द्यावा, अशी मागणी केली. गटनेते किशोर जामदार यांनी या सूचनेला अनुमोदन दिल्यानंतर महापौर कांचन कांबळे यांनी आजची सभा तहकूब केली. (प्रतिनिधी)