सूर्यफूल पिकाचे क्षेत्र तालुक्यात शून्य आहे, त्याकडे कृषी विभाग लक्ष देणार का, असा सवाल समोर आला आहे.
गतवर्षी पाऊस चांगला झाला. त्यामुळे तालुक्यातील तलाव, विहिरींची पाणी पातळी अद्याप तरी चांगली आहे. शिवाय पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. अद्याप या पेरण्यांना म्हणावा असा वेग आला नाही. तरीही साडेसात टक्के पेरणी झाली आहे.
कोरोनाच्या महामारीत शेतकरी, कष्टकरी भरडला गेला आहे. त्यामुळे शेतीची मशागत करताना व सद्य:स्थितीत पेरणी करताना आर्थिक ओढाताण सुरू आहे. तरीही यातून कसाबसा मार्ग काढत शेतकरी पेरणी करू लागला आहे.
तालुक्याचा कृषी विभाग व त्याचे अधिकारी, कृषी सहायक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बी-बियाणे पोहोच करू लागले आहेत. प्रमाणित बियाणे अनुदान तत्त्वावर देण्यात येत आहे. खरीप ज्वारीचे पेरणी क्षेत्र ५३९८ हेक्टर आहे. त्यापैकी फक्त ५५ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. बाजरी ४००, तर मका ७७६ हेक्टरवर, उडीद ७२० पैकी ३४३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सूर्यफूल शून्य क्षेत्र असल्याने त्याची पेरणीच झाली नाही. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीमुळे पेरणी मंदगतीने सुरू आहे.