सांगली : डिझेल, पेट्रोल दरवाढीचा फटका खासगी प्रवासी वाहनचालकांना बसला आहे. इंधन दरवाढीमुळे २० टक्के भाडेवाढ करावी लागली आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. बँकांचे हप्ते, घरखर्च भागवितानाही वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ६० टक्के वाहनचालकांनी आपली वाहने विक्रीसाठी काढली आहेत.
गेल्या तीन ते चार महिन्यात पेट्रोल व डिझेलच्या दराचा भडका उडाला आहे. त्याचा परिणाम सर्वच घटकांवर झाला आहे. खासगी प्रवासी वाहनधारकांनाही इंधनवाढीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी २० टक्के दरवाढ केली. कोरोनामुळे आधीच प्रवासावर बंधने आली आहेत. त्यात दरवाढीमुळे प्रवासाला बाहेर जाणाऱ्यांची संख्याही कमी झाल्याचे चालकांनी सांगितले.
चौकट
असे वाढले पेट्रोल, डिझेलचे दर (प्रति लिटर)
पेट्रोल डिझेल
जानेवारी २०१९ ७४.५७ ६४.४६
जानेवारी २०२० ८१.४९ ७१.२५
जानेवारी २०२१ ९३.०५ ८२.२५
ऑगस्ट २०२१ १०७.८२ ९५.९९
चौकट
प्रवासी वाहनांचे दर
वाहनाचा प्रकार दर
सियाझ १३ रु.
स्विप्ट डिझायर १२ रु.
इनोव्हा १५ रु.
टेम्पो ट्रॅव्हलर २२ रु.
चौकट
गाडीचा हप्ता कसा भरणार?
- पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्याने भाडे कमी झाले आहे. दरवाढीने खासगी प्रवासी वाहनांचा व्यवसायच संपुष्टात आणला आहे. गाडीचे हप्ते भरतानाही कसरत करावी लागते. - दीपक पाटील
- बहुतांश चालकांचे कुटुंब वाहनावर अवलंबून आहे. इंधन दरवाढीमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. अनेकांनी वाहने विक्रीसाठी काढली आहेत. - आकीब तोदलबाग