शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अभिजित भोसले यांचा आज राज्यपालांच्याहस्ते सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:26 IST

सांगली : ‘नवभारत’ संस्थेच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीचा ‘युथ लिडर इन हेल्थ केअर’ पुरस्कार काँग्रेसचे नगरसेवक अभिजित भोसले यांना जाहीर ...

सांगली : ‘नवभारत’ संस्थेच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीचा ‘युथ लिडर इन हेल्थ केअर’ पुरस्कार काँग्रेसचे नगरसेवक अभिजित भोसले यांना जाहीर झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते शनिवारी राज्यभवनात पुरस्कार वितरण सोहळा होणार असून, आरोग्यमंत्री राजेश टोपे व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख उपस्थित राहणार आहेत.

अभिजित भोसले यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. गेली वर्षभर कोरोना महामारीत भोसले यांनी रुग्णांसह नातेवाईकांना मदतीचा हात दिला आहे. कोरोना लाटेत मोफत अन्नदान, फिरता दवाखाना, होम आयसोलेशनमधील रुग्णांना मदत, ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेडसाठी मदत करण्यासाठी धावपळ केली. तसेच ६० बेडचे कोविड सेंटरही सुरू केले. लहान मुलांसाठी राज्यातील पहिले कोविड सेंटर सुरू केले आहे.

भोसले म्हणाले, कोरोना काळात जे काम केले, त्यासाठी मला मित्रांची साथ मिळाली. अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली. महापालिकेच्या डॉक्टर, नर्सेस इतर कर्मचार्‍यांनी चांगले सहकार्य केले. राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी प्रोत्साहन दिल्यानेच लढायला बळ मिळाले. भविष्यातही चांगले काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.