शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आबा, काकांचे गट आमने-सामने

By admin | Updated: July 14, 2014 00:34 IST

तासगाव नगराध्यक्षपद : बुधवारी होणार फैसलो

तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडीबाबत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. उद्या, सोमवारी अर्ज माघारीचा दिवस आहे. अर्ज माघारीनंतर दि. १६ रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष निवडीमध्ये मैदानात कोण राहणार, हे स्पष्ट होणार आहे.तासगावच्या नगराध्यक्ष निवडीवरून गेल्या आठ दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील व खा. संजयकाका पाटील या दोन्ही गटाकडून नगराध्यक्ष आपल्याच गटाचा व्हावा, यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत एकूण चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात गृहमंत्री आर. आर. पाटील गटातून शुभांगी साळुंखे यांचा, खा. पाटील गटातून बाबासाहेब पाटील व अविनाश पाटील यांचा, तसेच काँग्रेसचे संजय पवार यांचाही असे अर्ज दाखल झाले आहेत.उद्या, सोमवारी यामधील कुणाचे अर्ज राहणार, याकडे नजरा लागून राहिल्या आहेत. दोन्ही गटाकडून बहुमताचा दावा करण्यात येत आहे. त्यात काँग्रेसचा एकमेव सदस्य असणाऱ्या संजय पवार यांनी अर्ज भरून या निवडणुकीची रंगत वाढवली आहे.अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत दोन्ही गटाच्या सदस्यांच्या बैठका सुरू होत्या. गृहमंत्र्यांच्या गटातून शुभांगी साळुंखे यांचे नाव निश्चित करून त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला, तर खा. पाटील यांच्या गटातून बाबासाहेब पाटील व अविनाश पाटील या दोघांचे अर्ज दाखल करण्यात आले.गेल्या दोन दिवसांपासून या निवडीबाबतच्या चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यात गृहमंत्री पाटील व खा. पाटील हे दोघेही मतदारसंघात आहेत. या दोघांच्याही संपर्कात यांच्या गटाचे नगरसेवक आहेत. (वार्ताहर)