शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आबा, आज तुम्ही हवे होतात...

By admin | Updated: February 17, 2016 00:42 IST

सर्वसामान्यांची प्रतिक्रिया : कवठेमहांकाळ तालुक्यात भावपूर्ण आदरांजली

कवठेमहांकाळ : राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची पहिली पुण्यतिथी कवठेमहांकाळ तालुक्यात भावूक वातावरणात झाली. ठिकठिकाणी प्रतिमेस अभिवादन करून आबांना आदरांजली वाहण्यात आली. आजच्या टंचाईच्या स्थितीत जनतेला दिलासा देण्यासाठी आबा असायला हवे होते, अशी तीव्र भावना सर्वसामान्यांमधून उमटत होती.गतवर्षी १६ फेब्रुवारी रोजी आर. आर. पाटील यांचे निधन झाले. मंगळवारी त्यांच्या पहिल्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तालुक्यात विविध संस्थांच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. महांकाली साखर कारखान्यावर जिल्हा बँकेचे संचालक गणपती सगरे यांच्याहस्ते आर. आर. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील, पुंडलिक पाटील, हणमंत शिंदे, कार्यकारी संचालक मनोज सगरे, शेती अधिकारी रवींद्र चौगुले, मुख्य लेखाधिकारी राम सपकाळ, शंकर कदम, एम. बी. माळी उपस्थित होते. राजर्षी शाहू विचार मंचच्या कार्यालयात प्रा. दादासाहेब ढेरे यांच्याहस्ते आर. आर. पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती गजानन कोठावळे, मुबारक मुल्ला, राजाभाऊ सपकाळ, राजेंद्र बनसोडे, प्रा. शौकत मुलाणी उपस्थित होते. मळणगाव ग्रामपंचायतीत सरपंच रमेश भोसले यांनी आर. आर. पाटील यांना आदरांजली वाहिली. यावेळी सुधाकर पाटील, संजय चव्हाण, दीपक गुजले, पोपट गुजले, विजय मलमे, सचिन गुजले, राजू भोसले, मधुकर पाटील उपस्थित होते. हिंगणगाव ग्रामपंचायतीत सरपंच संगीता कोळेकर यांनी आबांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी नीलेश लोंढे, वर्षा लोंढे, शीतल पाटील, मधुकर कोळेकर, किसन शेजाळ, सुरगोंडा पाटील अनिल पाटील, गीतांजली माळी, शोभा सगरे, रावसाहेब पाटील, शशिकांत इरळे, अमोल लोंढे उपस्थित होते. कुची कॉर्नर येथेही विनोद देशिंगे, सुनील साळुंखे, आबासाहेब मेस्त्री, निखिल शिंदे, यल्लाप्पा चव्हाण यांनी आर. आर. पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. (वार्ताहर)विकास खुंटलाआबांसारखा दुसरा नेता पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही. आबांच्या जाण्याने केवळ तासगाव-कवठेमहांकाळचे नुकसान झाले असे नाही, तर सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. गरिबांचा आधार तुटला आहे. आबांची आठवण म्हणून आमदार सुमनताई पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण ताकद उभी करू, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे संचालक गणपती सगरे यांनी यावेळी दिली.