शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आबा-घोरपडे गटात पुन्हा चुरस

By admin | Updated: July 19, 2014 00:13 IST

कवठेमहांकाळ सभापती : सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ पंचायत समितीचे सभापती पद खुल्या वर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांना या पदाचे डोहाळे लागले आहेत. या आरक्षणाने गृहमंत्री आर. आर. पाटील गटातील वैशाली पाटील, तर माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे गटाच्या आशाताई पाटील यांची नावे चर्चेत आली आहेत. तालुक्यात विधानसभेसाठी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असताना, पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे, तर हे सभापती पदाचे आरक्षण खुल्या वर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांच्या आशा तर पल्लवीत झाल्याच आहेत, परंतु आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडीलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. पंचायत समितीची दोन वर्षापूर्वी निवडणूक झाली. यामध्ये दहा जागांपैकी आठ जागा गृहमंत्री आबा गटाच्या वाटणीला आल्या, तर दोन जागा घोरपडे गटाच्या वाट्याला आल्या. कोंगनोळी पंचायत समिती गणातून आशाताई पाटील, तर मळणगाव पंचायत समिती गणातून बाळासाहेब कुमठेकर हे घोरपडे समर्थक राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडून आले. अजितराव घोरपडे हे राष्ट्रवादीत नाहीत. तरीही हे दोन पंचायत समिती सदस्य त्यांचे कट्टर समर्थक मानले जातात. सद्यस्थितीच्या पंचायत समितीच्या राजकारणाचा विचार करता, कवठेमहांकाळ पंचायत समितीवर आबा गटाचे पूर्ण वर्चस्व आहे. फक्त आशाताई पाटील आणि बाळासाहेब कुमठेकर हे दोनच सदस्य घोरपडे यांचे आहेत, तर उर्वरित आठ सदस्य हे आबांचे आहेत. सभापतीपद खुल्या गटातील महिलांसाठी असल्याने आबा गटाकडे वैशाली पाटील या खुल्या वर्गातील सदस्या आहेत, तर घोरपडे गटाकडे आशाताई पाटील या एकमेव खुल्या गटातील सदस्या आहेत. कुची पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीमधून निवडून आलेल्या पाटील यांची सभापती पदासाठी वर्णी लागणार हे निश्चित मानले जाते. (वार्ताहर)